top of page

एका नव्या विचाराची वटपौर्णिमा



वटपौर्णिमा जवळ आली का सगळ्या सुवासिनी स्त्रीया खुप उत्साही असतात खुप उत्साहाने त्या पूजेची तयारी करतात , छान नटापट्टख करून नटतात. त्यातच जर नवी नवरी असेल तर अधिकच उत्साह असतो तिला . कथेतील नायिका (नेहा) हिची सुध्दा पहीलीच वटपौर्णिमा आहे.ती साजरी करताना तीला येणारी अडचण त्यातुन ती कशी मार्ग काढते व एक नवा विचार आमलात आणून ती तीची वटपौर्णिमा खुप आनंदाने साजरा करते . नेहा ची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे खुप उत्सुक झाली होती. आणि खुप उत्साहाने ती दोन-तीन आधीपासूनच वटपौर्णिमेची तयारी करायला चालू करते पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करते,दोन्ही हातांवर मेंहदी काढते,पहीलीच वटपौर्णिमा असल्यामुळे लग्नातील शालूच घालायचे ठरवते, दागिणे कोणते घालायचे ही ठरवते,त्या दिवशी केसांमध्ये माळायला गजरा आणायचाच म्हणून मिस्टरांना निक्षून सांगते,बाजारात जाऊन पूजासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन येते अशा प्रकारे सगळी तयारी तीची चालू असते.

वटपौर्णिमाच्या आधल्या दिवशी शेजारच्या देसाई काकूंकडून नेहा,तीच्या सासूला ला आणि बाकीच्या इतर शेजारील बायकांना कळते की त्यांच्या सोसायटी च्या जवळ जे वडांचे झाड होते ते एका बिल्डरने तोडले.त्यामुळे आता घरीच वटपौर्णिमा साजरी करावी लागणार असे सगळ्या जणी मिळून ठरवतात.

नेहाची खुप निराशा होते "अजून कोठे दूसरीकडे नाही का आई वडाचे झाड आपण तिथे जाऊत ना "नेहा सासूबाईला म्हणते. "नाही गं आता इथे आपल्या एरिया मध्ये तर जवळपास एकही वडाचे झाड नाही आधी चांगले दोन-तीन होते पण असेच काहीना काही कामासाठी तोडले आता हे एकच होते आपल्या एरियात ते पण ऐन वटपौर्णिमेच्या आधी तोडले बघ." सासूबाई नेहाला म्हणतात. "आजूबाजूला दूसर्या एरिया मध्ये पण नाही का असेल तर आपण तिथे जाऊत ना आई"नेहा सासूबाईला म्हणते "शक्यतो नसणारच,असते तर आपण सगळ्यांनी तिथे जायचे ठरवलेच असतेच.पण आता घरातच करावी लागणार पूजा." सासूबाई नेहाला म्हणतात. नेहा चा चेहरा लगेच पडतो.ती खुप नाराज होते ते पाहून सासूबाई नेहाला म्हणतात"अगं असे नाराज होऊन काय होणार आहे आपण घरी वडाच्या झाडाचे चित्र काढून करणारच आहोत की पूजा" "तरी पण आई मला झाड पूजायचे होते,फेर्या मारायचा होत्या ,मी खुप एक्साईट होते आई."नेहा म्हणाली. "आता इथे आजाबाजूला तर नसणारच कोठे वडाचे झाड ,तरीपण तु विनोदला (नेहाचे मिस्टर) विचार कोठे आहे का असेल तर आपण जाऊ तिथे मी हे आले की ह्यांनाही विचारते."सासूबाई नेहाला म्हणतात विनोद आँफिस मधून आल्यावर विचारायला इतका वेळ नेहाकडे पेशन्स नसतात ती त्याला आँफिस च्या वेळेत काँल करते आणि विचारते आपल्या एरिया मध्ये किंवा आजूबाजूच्या एरिया मध्ये कोठे वडाचे झाड आहे का? मित्रांशा सुध्दा विचारून चौकशी करायला सांगते. संध्याकाळी विनोद आँफिस मधून घरी आल्याबरोबर त्याला तुम्ही चौकशी केली का? वडाच्या झाडाची हाच प्रश्न विचारते."हो विचारले एक दोघांना इथे आसपास तर नाही कोठे तरी अजून एक दोघांना थोड्या वेळात विचारतो फ्रेश होऊन."विनोद म्हणतो विनोद फ्रेश होऊन थोड्या वेळाने अजून दोन तीन मित्रांकडे चौकशी करतो पण कोठेच आसपास च्या एरियात वडाचे झाड नसते.

रात्री झोपताना नेहा पुन्हा विचारते . विनोद कडून काही कळेल अशी आस लावून असते ती दिवसभर पण विनोद कडून सुध्दा नकारार्थी उत्तर ऐकून ती आधीपेक्षा खुपच नाराज होते.तिच्या चेहर्यावर तीची नाराजी स्पष्ट दिसते.ते पाहून विनोद म्हणतो "नको इतके नाराज होऊस आणि दरवर्षी बाहेर जाऊन पूजा करायची अशी अपेक्षा सुध्दा करू नकोस. आताच्या ह्या काळात डेव्हलपमेंट च्या नावाखाली रोज एका झाडाचा बळी जातोच. मग कसे राहतील झाडे ?ह्या पर्यावरणाची ,निसर्गाची आपण कधी विचार करत नाही कधी काळजी कळत नाही म्हणून तर ह्या नैसर्गिक आपत्ती मध्ये वाढ होत आहे. शुद्ध हवा मिळत नाही म्हणूनच आजाराचे प्रमाण सुध्दा वाढत आहे." विनोद च्या ह्या बोलण्याचा नेहावर खुप मोठा परिणाम होतो लगेच तिच्या मनात खुप सुंदर विचार येतो ते म्हणतात ना दिमाग कि बत्ती जल गई त्याप्रमाणे."बाकीच्या सगळ्यांनी घरीच पूजा करायचे ठरवले आहे ना मग तु पण घरीच कर ."विनोद म्हणतो. एकदम खुश होऊन नेहा म्हणते"नाही, मी नाही घरी करणार पूजा उद्या मी बाहेर जाऊनच वटपौर्णिमेची पूजा करणार."

"अगं पण कसे इथे आसपास आणि आजूबाजूच्या एरियात कोठेच वडाचे झाड नाही तर मग कसे.? विनोद विचारतो "ते कळेलच उद्या आणि बरे झाले उद्या तुम्हाला सुट्टी पण आहे म्हणजे तुम्हाला माझ्याबरोबर येता पण येईल."नेहा म्हणते "म्हणजे, तू नक्की कोठे जाऊन पूजा करणार आहेस? आणि वटपौर्णिमा पूजा मध्ये माझे काय काम?"विनोद विचारतो अहो उद्या कळेलच ना तुम्हाला आणि मी काही चूकीचे करेन का?तुमचा विश्वास आहे ना, प्लीज चला ना उद्या माझ्याबरोबर "प्रेमळ स्वरात नेहा म्हणते. "ठिक आहे मँडम जाऊ उद्या ,आपका हुकुम सर आखोंपर"थोड्याशा मस्करी मध्ये विनोद बोलतो दूसर्या दिवशी नेहा आधी ठरविल्याप्रमाणे शालू,दागिने, गजरा घालून तत्याळ होते.इकडे सासूबाईची घरी पूजा करण्याची तयारी चालू असते. नेहा येऊन सासूबाईना सांगते आणि विचारते "आई मी घरी पूजा नाही करत ,मी ह्यांनच्याबरोबर बाहेर चालले पूजा करायला तुम्ही पण चला ना." "बाहेर कोठे ? झाड मिळाले का कोठे?" सासूबाई विचारतात नाही नेहा उत्तर देते मग कोठे जाणार आहेस ? सासूबाई विचारतात "आई, तुम्ही आता काही नका विचारू प्लीज चला ना सोबत मग तुम्हाला कळेलच "नको जा तु ,झाड नाही तर मी घरातच करेन पूजा ,पण तु कशी करणार आहे पूजा झाड तर नाही सापडले ना." सासूबाई विचारतात "आई आल्यावर सांगेन तुम्हाला. तुम्ही आलात तर बरे होईल."नेहा म्हणते "जा तुम्ही दोघे उगाच मी कशाला तुमच्या मध्ये आणि आज त्याला सुट्टी पण आहे हे पण चांगले झाले .आणि बाहेर तुला पूजा करता आले नाही तर आल्यावर घरी कर मग मी हे ठेवते तसेच." सासूबाई म्हणतात. ठिक आहे आई असे म्हणून निरोप घेते. पार्किंग मधून गाडी बाहेर काढत विनोद विचारतो आता तरी सांग कोठे जायचे आहे . "निर्सरी मध्ये वडाचे झाड घ्याला."नेहा सांगते "अच्छा म्हणजे तु आधी झाड विकत घेणार आणि मग पूजा करणार." "नाही, मी झाड विकत घेणार आणि लावणार हीच माझी आजची वटपौर्णिमेची पूजा असेल."नेहा म्हणते. नेहा चा विचार ऐकून विनोद ला नेहाचे खुप कौतुक वाटते. व्वा डिअर !!! किती छान विचार केला तु असे बोलत विनोद नेहा चे खुप कौतुक करतो. "माझे नका कौतुक करू,कौतुक तर तुमचे केले पाहिजे,रात्री तर तुम्ही पर्यावरण बद्दल बोलला नसतात तर मला हे सुचले नसते."नेहा बोलते

"मी जे सांगितले ते खरे आहे पण तुझ्या सारखा विचार मी केला नसता वडाच्या झाडाची पूजा करण्यापेक्षा वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करायची हे असे मला सुचले नसतेच . खरंच खुप छान विचार आहे हा प्रत्येकाने हा विचार आमलात आणला तर आपले हे पर्यावरण चांगले राहील आणि आपण सुध्दा निरोगी राहू."विनोद म्हणतो. त्यानंतर ते निर्सरी मध्ये जाऊन वडाचे आणि घरी लावण्यासाठी काही फुलांची झाडे खरेदी करतात. त्यांच्या एरिया मध्ये असणाऱ्या बागेत जाऊन ते तेथील माळी च्या मदतीने ते झाड लावतात. अशा प्रकारे झाड पूजण्यापेक्षा ते झाड लावून नेहा तीची दरवर्षीची वटपौर्णिमा साजरी करायला चालू करते .

सोनाली चंदनशिवे सोलापूर

csonali2017@gmail.com विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

154 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page