top of page

विश्व मराठी परिषदेचे नियोजित उपक्रम

१.

प्रत्येक वर्षी किमान तीन अखिल भारतीय साहित्य संमेलने / महोत्सव, युवा साहित्य महोत्सव, महिला  साहित्य महोत्सव,  बाल साहित्य महोत्सव आयोजित करणे.

२.

प्रत्येक वर्षी  किमान तीन जिल्हास्तरीय साहित्य महोत्सव, अखिल भारतीय जिल्हा युवा साहित्य महोत्सव   अखिल भारतीय जिल्हा महिला साहित्य महोत्सव, अखिल भारतीय  जिल्हा बालसाहित्य महोत्सव आयोजित करणे

३.

प्रत्येक इच्छुकाला सहजपणे सभासदत्व लाभावे. – ग्रंथविक्रेते, रसिक, वाचक, प्राध्यापक, वकील, लेखक प्रकाशक, डॉक्टर, विद्यार्थी, ग्रंथालये, ग्रंथपाल, शेतकरी, चित्रकार, फोटोग्राफर, वार्ताहर , पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, गृहिणी इ. समाजातील सर्व स्तरांतील बंधू-भगिनींना सहभागी करून घेणे.

४.

प्रत्येक सभासदाला मतदानाचा अधिकार – अखिल भारतीय स्तरावरील तीन संमेलने / महोत्सव अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक सभासदाला मतदानाचा अधिकार देणे.

५.

मराठी भाषेसाठीच्या सरकारी सहाय्य योजना, शिष्यवृत्ती योजना, विविध पुरस्कार योजना यांची माहिती व मार्गदर्शन करणे.

६.

देश-विदेशांतील विविध पुरस्कार, योजना, विविध साहाय्य योजनांची माहिती देणे मार्गदर्शन करणे.

७. 

देश-विदेशांतील मराठी साहित्य, संस्कृतीसंबंधित कार्य करणाऱ्या सर्व संस्थांची माहिती व तेथील कार्यात सहभागी होण्याची संधी लाभणे.

८. 

खेडेगाव ते विभागीय, राज्य पातळी, अखिल भारतीय पातळी आणि विश्वातील ३०० हून अधिक मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजकांची संपर्क क्रमांकासह माहिती व मार्गदर्शन. ( उदा. महाराष्ट्रातील ग्रामीण, निमशहरी आणि विविध प्रकारची साहित्य संमेलने,  देशातील विविध साहित्य महोत्सव उदा. चेन्नई लिटररी फेस्टिवल, बंगळुरू लिटररी फेस्टिवल,  जयपूर लिटररी फेस्टिवल; आणि आंतरराष्ट्रीय उदा.  दुबई लिटररी फेस्टिवल, युरोप लिटररी फेस्टिवल;  अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील साहित्य महोत्सव, बृहन महाराष्ट्र मंडळांचे साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव, इ. )

९. 

देश-विदेशांतील मराठी साहित्य संमेलने, महोत्सव, उपक्रमांमध्ये प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हायची संधी

१०. 

ग्रामीण भागातील तसेच आर्थिक दुर्बल नवोदित लेखकांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ५०% अनुदान देणे. (परिषदेच्या निकषानुसार)

११. 

साहित्यविषयक संशोधन प्रकल्प आणि शोध मोहिमांमध्ये सहभागी व्हायची संधी 

१२. 

परिषदेची घटना, कार्यपद्धती, अधिकार आणि कर्तव्ये ऑनलाईन पाहता येणे.

१३. 

साहित्यविषयक – कॉपीराईट, आयएसबीएन इ. विषयक कार्यशाळा आयोजन व मार्गदर्शन

१४. 

युवा पिढीसाठी महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन कार्यशाळा आयोजन

१५. 

साहित्यविषयक छोट्या, मोठ्या कालावधींचे अभ्यासक्रम, तसेच साहित्य रसग्रहण कार्यशाळा आयोजन, इ.

१६. 

प्रत्येक सभासदाच्या सक्रिय सहयोगातून संमेलने, उपक्रम, सर्वांना मुक्त प्रवेश. विचार, योजना, माहिती, उपक्रम यांची मुक्त देवाणघेवाण

१७. 

१२ कोटी मराठी बांधवांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न.

१८. 

प्रत्येक सभासदाला विविध साहित्यिक / सांस्कृतिक संमेलने / उपक्रमांचे अपडेट्स मिळणे.

१९. 

नवीन वाचनीय पुस्तकांची माहिती, सवलतीत घरपोच पुस्तके मिळणे.

२०.

ई-बुक / किंडल बुक / ऑडिओबुक आणि तंत्रज्ञानविषयक जागरुकता मोहीम राबविणे.

२१.

मराठीची सर्व वाचनालये आणि ग्रंथपालांना जोडणे.

२२.

साहित्यिक हेल्पलाईन – साहित्यविषयक सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत मार्गदर्शन करणारी हेल्पलाईन.

२३.

साहित्य अनुभव संवर्धन मोहिमा, अभ्यास सहली, साहित्यिक परिक्रमा.

२४.

साहित्यिक घडामोडींवर चर्चा - इंटरअ‍ॅक्टिव्ह ब्लॉग – सर्वांना मोफत सहभागी होता येईल.

२५.

अद्ययावत माहितीने परिपूर्ण संकेतस्थळ व अ‍ॅप.

२६.

मराठीतील ५ हजारांहून अधिक लेखक व प्रकाशक यांची माहिती सभासदांना देणे.

२७.

मराठी साहित्य भारतातील इतर भाषांमध्ये / विश्वातील इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावे म्हणून विशेष उपक्रम.

२८.

तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून वाचक, लेखक आणि साहित्य यांना जोडणे.

२९.

गरजू साहित्यिक / ग्रंथविक्रेते / कार्यकर्ते यांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत.

३०.

मराठी साहित्यामध्ये भरीव योगदान दिलेल्यांना जीवनगौरव पुरस्कार देणार.

३१.

महाविद्यालये, विद्यापीठे, विद्यार्थी जोडून घेणे, तेथे कार्यशाळा घेणे, साहित्यिक उपक्रमांसाठी आणि वाड्मयीन मंडळासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणे.

३२.

इतर भारतीय भाषांमध्ये साहित्य संमेलने / महोत्सव आयोजित करण्यास सहकार्य करणे, इ.

bottom of page