top of page
विश्व मराठी परिषदेची उद्दिष्ट्ये
मुख्य उद्दिष्ट : सक्षम....संपन्न...समृद्ध वैश्विक मराठी ब्रँड तयार करणे...
कोणत्याही भेदभावाविना साहसी, पराक्रमी, उदार, सर्वांना मदत करणारा, वैश्विक भान असणारा, मराठी संस्कृती आणि सभ्यता जोपासणारा असा वैश्विक मराठी भाषिक समाज निर्माण करणे.
विविध प्रकारची उपयुक्त माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे.
मराठी भाषिक निर्माता, उद्योग , सेवा पुरवठादार आणि उपभोक्ता यांना थेट जोडून घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
मराठी माणसांचे नेटवर्किंग होईल यासाठी संसाधने निर्माण करणे.
विविध स्टार्ट-अप, नवउद्योग यांची स्वतंत्र पोर्टलवर माहिती उपलब्ध करून देणे.
विविध कलाकार, सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिर, ग्रामोद्योग, बचतगट यांची माहिती उपलब्ध करून देणे.
विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची / संस्थांची माहिती करून देणे.
देश विदेशातील मराठी भाषिकांच्या बातम्या, उपक्रमांची माहिती थेट वर्तमानपत्रांचे/ मासिकांचे/ वृतवाहिन्यांचे / इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार यांच्या पर्यंत थेट पोहोचवणे.
देश विदेशातील नोकरीच्या / रोजगाराच्या / व्यवसायाच्या / स्वयंरोजगाराच्या संधी स्वतंत्र पोर्टलद्वारे सर्वांना उपलब्ध करून देणे.
उद्योग, व्यवसाय , स्वयंरोजगार यासाठी भांडवल उभारणी / समूह वित्त / साहसी वित्त उभारणी साठी सहाय्य मिळवून देणे.
महाराष्ट्रातील संस्थांना भारतातून आणि विविध देशातून विविध प्रकारचे सहाय्य मिळवून देणे, यासाठी मार्गदर्शन करणे. इ.
उद्योजकीय संस्थांना संयुक्त उपक्रम , सहयोगी उपक्रम, उद्योग संपादन, आणि विलिनीकरण याबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य करणे.
मराठी भाषिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारची माहिती देणारी एक हेल्पलाईन सुरू करणे तसेच संशोधन केंद्र सुरू करणे.
मराठी भाषिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक स्वतंत्र मीडियाची निर्मिती करणे.
मराठी भाषिकांमध्ये तंत्रज्ञान, माहिती, संधी इ. अनेक प्रकारच्या उपयुक्त माहितीची देवाणघेवाण करणे.
१२ कोटी मराठी बांधवांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न.
इतर भारतीय भाषांमध्ये साहित्य संमेलने / महोत्सव आयोजित करण्यास सहकार्य करणे. इ.
येत्या १० वर्षामध्ये ४० वर्षांखालील किमान ५००० नवीन लेखक तयार व्हावेत यासाठी सहाय्य करणे.
येत्या १० वर्षांमध्ये विदेशामध्ये राहणारे किमान १००० नवीन लेखक तयार व्हावे यासाठी सहाय्य करणे.
मराठीतून लिहणारे २ लाख ब्लॉग लेखक तयार व्हावेत , यासाठी सहाय्य करणे.
देश विदेशातील ५ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडून घेणे.
मराठी लेखक, साहित्यीक, प्रकाशक,व्यावसायिक, उद्योजक, नवाउद्योजक, विद्यार्थी, गृहिणी, कलाकार, खेळाडू, ब्लॉगर, युवा पिढी यांना एक निखळ व्यासपीठ उपलब्ध व्हावे.
किमान एक लाख मराठी पुस्तके किंडल/ ई-बुक / ऑडिओ बुक यामध्ये उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न करणे.
मराठी लेखकाला बुकर / नोबेल अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत जाता यावे, यासाठी प्रयत्न करणे.
ग्रामीण, शहरी, निम शहरी, इतर राज्ये आणि विश्वभरातील मराठी भाषिकांच्या विविध उपक्रमांमध्ये समन्वय आणि सहकार्य असावे यासाठी प्रयत्न करणे.
bottom of page