top of page

विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर आपले साहित्य प्रसिद्ध करण्याची संधीWrite a Blog on Vishwa Marathi Digital Plaform
Vishwa Marathi Parishad Blog

खालीलपैकी आपल्या आवडीच्या विषयावर आपले लेख, कथा, कविता, विचार इ. लिहा आणि आम्हाला ईमेलवर पाठवा. सर्व पात्र साहित्य, विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर आपल्या नाव, ईमेल आणि संपर्क क्रमांकासहित प्रसिद्ध केले जाईल. त्याचबरोबर परिषदेच्या सोशल मिडियावर शेअर केले जाईल.


 

खालील नियम व सूचना वाचा आणि आपले साहित्य पाठवा

१) या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

२) आपले साहित्य पुढील ब्लॉगवर प्रसिद्ध होणार आहे.

३) कथा / लेख इ. किमान ५०० ते कमाल २००० शब्दांचे असावेत.

४) कविता लेखन - किमान १२ ते कमाल ३० ओळी


५) आपले साहित्य फक्त blog.vmparishad@gmail.com या ईमेलवरच पाठवायचे आहे. ईमेलद्वारे आलेले साहित्यच स्वीकारण्यात येईल.   

७) साहित्य युनिकोड मध्ये टाईप करुन इमेलवर पाठवा. यूनिकोड मध्ये टाइप केलेली Word File सुद्धा चालेल मात्र PDF/Image पाठवू नये.

८)  इमेल पाठवताना ईमेलचा विषय (Subject)  – “वि.म.प ब्लॉगसाठी - < लेखन प्रकार व शीर्षक>”.

९) इमेलमध्ये आपले नाव, मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक, स्त्री/पुरुष, शहर ही माहिती पाठवावी. साहित्य आणि माहिती एकाच इमेलमध्ये पाठवावी. खालीलपैकी कोणत्या विषयावर लेखन केले आहे तो विषय नमूद करावा.


१०) लेखन व्यवस्थित टाईप करावे. सुटसुटित मांडणी, योग्य ठिकाणी परिच्छेद, व्याकरण इ. काळजी घ्यावी. शक्य असल्यास लेखासंबधित संलग्न चित्र / कव्हर फोटो पाठवावा.

११)  एक व्यक्ती एका आठवड्यात एकच लेख/कथा/कविता पाठवू शकते. परिषदेचे आजीव सभासद असाल तर एका महिन्यात दहा लेख/कथा/कविता पाठवू शकते.


१२) आपले लेखन पूर्वी इतरत्र कोणत्याही सोशल मिडियावर (व्हॉटसअप/फेसबुक/इनस्टाग्राम इ.) प्रकाशित झालेले नसावे.  विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यानंतर त्याची लिंक आपण शेअर करू शकता. किंवा सोशल मिडियावर त्या ब्लॉगची लिंक व आपले लेखन शेअर करू शकता. 

१३) आपण पाठवलेले लेखन स्वलिखित असावे. वाङमयचौर्य आढळण्यास अशा व्यक्तींचे सर्व लेखन परिषदेच्या ब्लॉगवरून रद्दबादल करण्यात येईल.   


१४)  या उपक्रमाला मुदत नाही. प्रथम प्रवेश, प्रथम प्राधान्य असेल. दररोज सुमारे ३ ते ५ पोस्ट प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

१४) आपल्या लिखाणामध्ये सकारात्मकता असावी. भारतीय संस्कृती, देश, परंपरा इ. विषयी आदर असावा. समाजात तेढ वाढविणारे नसावे.


१५) आपले लेखन प्रकाशित करण्याची मुदत आपला ईमेल मिळाल्यापासून किमान १० दिवस असेल. त्यानंतरही प्रकाशित झाले नसेल तर आपण ईमेलद्वारे चौकशी करू शकता.  

१५) साहित्य स्वीकारण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय विश्व मराठी परिषदेच्या संपादकीय मंडळाचा असेल. त्याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.


१६) न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण


 

विषय:

साहित्य, संस्कृती आणि ग्रामिण संस्कृती/परंपरा लोकसाहित्य सामाजिक ज्वलंत विषय ✅करिअर आणि कौशल्ये ✅शैक्षणिक उपक्रम ✅युवकांची स्वप्ने आणि समस्या ✅उद्योजकता ✅सामाजिक विषमता

उत्सवांचे बदलते स्वरुप ✅आरोग्य ✅नागरिकांचे कर्तव्य व अधिकार ✅कायदे साक्षरता ✅सामाजिक साक्षरता ✅पौराणिक इतिहास ✅आध्यात्म व धार्मिक विषय ✅पर्यावरण ✅जीवनशैली आणि व्यवस्थापन

सांस्कृतिक इतिहास ✅सांस्कृतिक पर्यटन / प्रवास वर्णन ✅अध्यात्म व धार्मिक विषय ✅विविध भारतीय कला ✅लोकनाट्य, नृत्य ✅मानसशास्त्र ✅विनोदी ललित साहित्य ✅कुटुंब शिक्षण / कल्याण ✅आयुष्यातील प्रेरणादायी घटना ✅मला आवडलेले पुस्तक/चित्रपट/ठिकाण/व्यक्ति इ. 


 

लिहिते व्हा... व्यक्त व्हा... आपले लेखन जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पाठवा. सहभागी व्हा तसेच वाचक म्हणून सुद्धा ब्लॉग वाचा, प्रतिक्रिया द्या, आवडले तर शेअर करा.


हे आवाहन आपल्या अधिकाधिक लेखक, कवी, साहित्यिक, निवृत्त अधिकारी, तरुण-तरुणी, सहकारी मित्रांना व ज्या कोणाकडे सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी लेखन करण्याची उर्मी आहे त्या प्रत्येकापर्यंत  शेअर करा.


446 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page