विश्व मराठी परिषदेची स्थानिक शाखा सुरू करा

विश्व मराठी परिषदेतर्फे नम्र आवाहन

विश्व मराठी परिषदेची स्थानिक शाखा सुरू करणे बाबत...

१) विश्व मराठी परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, मोठ्या शहरात, उपनगरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी, महाविद्यालयात परिषदेच्या शाखा सुरु करावयाच्या आहेत. तसेच महाराष्ट्राबाहेर विविध राज्यात मराठीबहुल भागात परिषदेच्या स्थानिक शाखा सुरू करावयाच्या आहेत.  सुमारे दहा ते पंचवीस हजार या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ठिकाणी स्थानिक शाखा स्थापन करावयाची आहे.

२) ज्या ठिकाणी स्थानिक शाखा सुरू करावयाची आहे तेथे प्रवर्तकाने ( शाखा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीने ) परिषदेचे किमान १२ आजीव सदस्य करणे अपेक्षित आहे. प्रवर्तक एक, दोन, तीन किंवा समूह असू शकेल. आजीव सदस्य वर्गणी एकदाच भरावयाची असून ती रुपये ८०० ( प्रवेश ₹१०० + आजीव सभासदत्व ₹५००+  सभासदत्व प्रमाणपत्र ₹२०० ) एवढी आहे. सभासदत्व ऑनलाईन घ्यावे. त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.
www.vishwamarathiparishad.org/sabhasad 

३) स्थानिक शाखेचे नाव, पदाधिकारी यांचे  संपर्क क्रमांक, माहिती विश्व मराठी परिषदेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.  तसे पत्र प्रवर्तकाना देण्यात येईल. स्थानिक शाखेचा शुभारंभ कार्यक्रम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित केला जाईल.  प्रत्येक वर्षी किमान सहा कार्यक्रम व उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ व्याख्याने, कार्यशाळा, साहित्य- संस्कृती यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम, प्रशिक्षण, अभ्यास सहली, संमेलने मेळावे इत्यादी. यासाठी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयातून सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहाय्य केले जाईल. विश्व मराठी परिषदेच्या बॅनरखाली स्थानिक बँका, उद्योगसमूह इत्यादी संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळवता येईल.

४) स्थानिक पातळी बरोबरच विभागीय पातळीवर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी होता येईल.

५) स्थानिक शाखेची सुरुवात करणाऱ्या शाखेला सुरुवातीला पाच वर्षे कालावधी दिला जाईल.  त्यामध्ये त्यांनी स्थानिक शाखा विकसित करणे अपेक्षित आहे. सक्षम संपन्न समृद्ध वैश्विक मराठी प्रतिमान तयार करण्याच्या दृष्टीने तळमळीने काम करून आपल्या परिसरात किमान एक हजार सभासद करणे तसेच विविध उपक्रमांद्वारे समाजाला राष्ट्राला आणि मराठी भाषिक समाजाला विकसित करण्यासाठी योगदान देणे अपेक्षित आहे.

६) स्थानिक शाखा स्थापन करणाऱ्या प्रवर्तक आणि समन्वयक यांना संगणक, मोबाईल, ईमेल व्हाट्सअप इत्यादी सोशल मीडियाची तंत्रे अवगत असणे अपेक्षित आहे.

७) सर्व कामकाजामध्ये परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचा निर्णय अंतिम असेल. कृपया कोणतीही माहिती, शंका यासाठी नि:संकोचपणे संपर्क साधावा.  त्यानंतर पूर्ण तयारीनिशी व आत्मविश्वासाने शाखा सुरू करावी.  

अधिक माहितीसाठी संपर्क - स्वाती यादव 9673998600
कळावे. 
आपले
प्रा.क्षितिज पाटुकले - संस्थापक अध्यक्ष 
अनिल कुलकर्णी - संस्थापक संचालक 
प्रा.अनिकेत पाटील
मुख्य संयोजक