
अलक लेखन*
अलक लेखन म्हणजे काय? (इंटरनेट संदर्भ)
अलक म्हणजे अती लघु कथा .हा मराठी गद्य कथा लेखनाचा एक प्रकार आहे. हा प्रकार काहीसा चारोळी या पद्य- लेखन प्रकारासारखा आहे. हा प्रकार सोशल मिडियावर जास्त प्रचलित आहे, कारण तो जास्त जागा व्यापत नाही.
अलक लेखनाचे दोन उपप्रकार आहेत. सकारात्मक आणि नकारात्मक.अलक लेखनासाठी शब्दमर्यादा काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते.शब्द मर्यादा १०० पेक्षा जास्त नसावी.अलक लेखनातून अगदी थोडक्या शब्दात, अर्थपूर्ण कथेचा आनंद वाचकांना देता येतो. या लेखन प्रकारात कमीत कमी पात्र आणि कमीत कमी पण योग्य (apt) शब्द वापरून लेखकला आपल्या भावना प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहचविता येतात.वाचकांच्या काळजाला भिडणारी, हृदयस्पर्शी आणि वाचकांना विचार करण्यास भाग पाडणारी अशी कथा असावी.वाचकांचं मन हेलावून टाकणारी,वाचकांना निःशब्द करणारी आणि मोजक्या शब्दातच रसिकांना आपलस करणारी कथा म्हणजे अलक लेखन होय.
अलक चे एक उदाहरण......
स्वलिखीत अलक...
*वचन*
आज वेलेंन्टाईन डे.अंजुने कपाटातून डायरी काढली.अनुजने दिलेली गुलाबाची फुलं न्याहाळत,त्या गोड आठवणीत ती हरवली.कॉलेजच्या शेवटच्या वर्षी दिलेलं हे गुलाब.त्याने आयुष्यभर साथ देण्याचं *वचन* दिलं होतं.पण .......
दारावरची बेल वाजली आणि अंजु भानावर आली.बाबांनी दरवाजा उघडला.अनुज तू ! हो.
गुलाबाचं फुल अंजुला देत म्हणाला *तू माझ्याशी लग्न करशील ?*
"अरे ! पण मी अशी !!
जशी आहेस तशी मला हवी आहेस.
आनंदाच्या भरात तीची एक कुबडी खाली पडली.अनुजने तीची कुबडी बनून तीला आधार देत, तीचा हात हातात घेत वचन दिलं *मी तुला कधीच सोडणार नाही*
ज्योती सुनील पाटील
जोगेश्वरी मुंबई
9820963832
स्त्री
शहर...मुंबई
Email.: pjyotiveera@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
अलक विषयी सुंदर माहिती ...आणि अलक कथा लिहून समजावले.तेही खूपच सुंदर!🙏🙏🙏