top of page

ऋग्वेद अर्थसार आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणे

मी ऋग्वेद वाचलेला नाही. असे सांगितले जाते की, ऋग्वेद अत्यंत रटाळ, रुक्ष, नीरस आणि वाचण्यास कंटाळवाणा आहे. त्यामध्ये अनेक प्रार्थनांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामध्ये अनेक कालबाह्र देवांच्या प्रार्थनांची पुनरावृत्ती झालेली आहे, परंतु जिज्ञासा म्हणून मी जेव्हा ""ऋग्वेद अर्थसार आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणे'' या पुस्तकाची पिं्रट वाचली तेव्हा माझा ऋग्वेदाबद्दल असणारा गैरसमज दूर झाला. ऋग्वेद म्हणजे नुसते कर्मकांड, मंत्र-तंत्र यज्ञविधी नसून यामध्ये खगोल, भूगोल, न पुढे त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. दिलेली स्पष्टीकरणे स्वीकाराहार्य आहेत. त्याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी पूर्वाचार्यांनी दिलेली स्पष्टीकरणेही उद्धृत केलेली आहेत. लेखकाने आपली स्पष्टीकरणे ही अत्यंत थोडक्यात दिलेली आहेत. त्यामुळे स्पष्टीकरणे समजण्यासाठी ती अनेक वेळा वाचावी लागतात. स्पष्टीकरण करताना लेखकाने त्याचे आणखी विश्लेषण केले असते तर सामान्य वाचकांना हे पुस्तक समजणे आणखी सोपे गेले असते. लेखकाने या पुस्तकाच्या शेवटी संदर्भयादी दिलेली आहे. ही यादी पाहून लेखकाचा या विषयावर दांडगा अभ्यास आहे हे दिसून येते. या पुस्तकाचा सारांश विचारात घेतला तर प्राचीन ऋषिमुनी तारे आणि नक्षत्रांना देव मानत होते असे दिसते. सूर्यनारायण हा प्रथम देव आहे, सूर्य हा एक तारा आहे. म्हणजे सर्व तारे देवच आहेत, अशी यामागची भूमिका होती. म्हणून तेहतीस देवांची गणती करताना नक्षत्रांची 27 ही संख्या घेऊन 33 देवांची बेरीज केलेली आहे. अश्विनीकुमाराबाबत एक नवीन आणि आश्चर्यकारक स्पष्टीकरण लेखकाने केलेले आहे. अश्विनीकुमार म्हणजे अश्विन नक्षत्रातील दोन जुळे तारे आहेत, असे लेखकांचे प्रतिपादन आहे. त्याचप्रमाणे यम आणि यमी हे सुद्धा अश्विन नक्षत्रातील जुळे तारे होते पण ते तारे नष्ट झालेले आहेत, असे लेखकांचे म्हणणे आहे. यावर विद्वानांनी विचार करणे आवश्यक आहे. ऋभू बंधूबद्दल अत्यंत वास्तव स्पष्टीकरण केलेले आहे. ऋभू हे संशोधक आणि जनावरांचे वैद्य होते म्हणून ते मानव असूनसुद्धा त्यांना ऋग्वेदामध्ये अर्धदेवांचे स्थान दिले गेले आहे. लेखकाने लेखकाने इंद्रसूक्ते आणि अग्निसूक्ते यांचे सुंदर विश्लेषण केलेले आहे. ऋग्वेदकालीन प्रत्येक देवताची वेगळी प्रकरणे केल्यामुळे प्रत्येक देवताचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येते. "अस्य वामीय तत्त्वज्ञान' या प्रकरणामध्ये ब्राहृांड निर्मितीचा तसेच सूर्य उत्पत्तीचा तर्कसंगत विचार मांडला आहे. बृहस्पती आणि तारा तसेच उषा आणि प्रजापिता या प्रकरणामध्ये नवीन विचार मांडून तारा आणि प्रजापिता याबद्दल लोकमानसामध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्राहृदेवांची कालगणना या प्रकरणामध्ये कल्प, युगे, त्यांचा काल, तारेनिर्मितीचा काल तसेच विष्णुच्या अवतारांचा काल निश्चित केलेला आहे. संपूर्ण पुस्तकामध्ये ऋग्वेदकालचे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि भूगर्गीय चित्र उभे केलेले आहे. इतर अनेक प्रकरणांमध्ये लेखकाने स्वत:चे विज्ञाननिष्ठ विचार मांडले आहेत, ते मान्य करण्यासारखे आहेत.

एकूणच हे पुस्तक सुजाण, सुसंस्कृत, देशप्रेमी आणि संस्कृतीप्रेमी नागरिकांनी अभ्यासणे जरूर आहे.लेखक हे रेल्वेमध्ये सोलापूर डिव्हिजनमध्ये तिकिट निरीक्षक होते. सेवानिवृत्तीनंतर एक सामान्य वर्गातील व्यक्ती ऋग्वेदासारख्या गंभीर विषयावर तर्कसंगत आणि विद्वत्तापूर्ण लिखाण करते, वेदातील गूढ ज्ञान जगासमोर मांडते हे एक आश्चर्यच आहे. लेखकाचे जेवढे म्हणून कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या भावी लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्याकडून नवनवीन ग्रंथसंपदा, घडो ही सदिच्छा.


इबुक डाउनलोड करा :

प्रा. डॉ. नामदेवराव रा. गरड

(एम.ए.,बी.एड.,एलएल.बी.,पीएच.डी.)

एम. ए. मराठी, एम. ए. इतिहास

माजी डीन व एम. सी. मेंबर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

माजी उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदमेंबर अखिल भारतीय इतिहास परिषद


लेखक संपर्क:

श्री. बापू कुंभार ( सोलापूर )

मोबईल न: ७७०९५८१४०७

व्हॅट्स एप: ९६३७८०७२७१



538 views0 comments
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page