top of page

ब्रेकथ्रू



महाराष्ट्र शासनाने तेव्हा ड्रग अब्युज वर मोहीम सूरू करायचं ठरवलं होतं . त्याकरता शासनाने एक फूल फ्लेज्ड ऍडवर्टायझिंग कॅम्पेन करायचं ठरवलं होतं . एक काॅम्पीटीशन लाॅन्च करून व सर्व ऍडवर्टायझिंग एजन्सीजना त्यात भाग घेण्यासाठी पाचारण धाडलं गेलं. एक लाख प्लस रोख इनाम विनींग कॅम्पेनला मिळणार असं जाहीर झालं . आमच्या ऍड एजन्सीने त्यात हिरहिरीने भाग घ्यायचं ठरवलं ... म्हणजे आमच्या सी . ई .ओ . ने ठरवलं . आम्ही सगळेच आपापल्या परीने दोघा दोघांच्या टीम करून ह्या विषयाची माहिती काढायच्या कामाला लागलो. तो काळ आपल्या इथे इंटरनेटचा नव्हता.... त्यामूळे वैखरी, कागद , पेन , अष्टावधान , अशा सर्व गोष्टी घेऊन काम करावं लागायचं . काही दिवसातच आमच्याकडे भरपुर अनूभवसिद्ध माहिती गोळा झाली होती . ग्रूप डिसकश्न्स मधे जे अनूभव आम्ही सांगायचो ते ऐकल्यावर अन्नही नकोसं वाटायचं .... व्यसनाधीन व्यक्ती किती अगतिक, लाचार , दिनवाणं आयुष्य पत्करते हे बघून कधीकधी खूप किळस यायची . एखादी व्यक्ती जेव्हा असं काही निवडते जे स्वतःलाच बेचिराख करू शकतं , हे जाणून खूपदा आमच्या आकलनाच्या सीमा व्यापक बनवत होतं . खूप सगळी माहिती जरी गोळा झाली असली तरीही आमच्या ऍडज् काही जमत नव्हत्या . काॅपी रायटर्स , आर्ट डायरेक्टरस् ... आम्ही सगळेच ब्लाॅकड् होतो . आमचा सी .ई. ओ . स्वतः एक चांगला काॅपी रायटर होता . बरेच दिवस आम्हाला ती विंनिंग कॉन्सेप्ट , ती विंनिंग लाईन मिळत नव्हती. एका शुक्रवारी ऑफिस सोडायच्या आधी आमच्या बाॅसने फर्मान काढलं...


" टूमाॅरो वी वर्क . आय वाॅन्ट यू ऑल हिअर फाॅर द होल डे " .


झाsलं...शनिवारची सुट्टी गेली ! माझा भटकंती कार्यक्रम कॅन्सल करून उद्याच्या महामारीवर तोडगा काढायचं ठरवलं. बॉस सगळ्यांची बिन पाण्याची... करणारच होता ... परत पहिल्यापासून विचार करायला सूरू केल्यावर एक धागा मिळाला. सांगून बघुया असा विचार करून शांत झोपले.


दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसच्या काॅनफरन्स रूम मधे आम्ही सगळे जमलो . बॉस सिरीअस मूड मधे आधीच येऊन बसला होता. अकाऊंट एकझीक्यूटीव्हस् , क्रीएटीव्ह टीम बरोबर प्राॅडकशन आणि स्टूडिओ टीम पण हजर होती. वास्तविक क्रीएटीव्ह टीमचा मामला आमच्या साहेबाने सर्वांसाठी खुला केला होता .... जेणेकरून कोणालाही काही सुचल्यास कॅम्पेन मार्गी लागावं . सगळे जमल्यावर बाॅसने आम्हा सर्वांना धारेवर धरलं ... आम्ही सगळेच पप्पू चप्पू गपगूमान सारे वार झेलत होतो . एक दोन सजेशन्स म्हाराजांनी शकलं करून धुडकावून लावली. स्वारी खूपच आवेशात होती . ऊभ्याऊभ्याच दोन्ही तळहात टेबलावर ठेवून सभ्य भाषेत बंबारडींग चालू होतं . मग स्वारी टेबल सोडून दोन पावलं इकडेतिकडे चालू लागली . कोणी काहीही सजेशन्स केली की , ते हा माणूस लॉजिकली खोडून टाकायचा . शेवटी सारं काही एकवटून ,


" मे आय मेक अ पॉईंट क्लिअर प्लीज " ...बोलून टाकलं .

उत्तर आलं ...," शूट " . मनातल्या मनात कंबरपट्टा घट्ट करून सुरवात केली. पूढचा सर्व मोनोलॉग इंग्लिश मधे होता ...त्याचं मराठीकरण सादर करते .


" कुठल्याही व्यक्तीला ड्रगस् नॉर्मली कोणीतरी पहिल्यांदा फ्री ऑफर करतं . शालेय जीवनात आणि काॅलेज मधे मित्र मैत्रिणींचा इनफ्लूएन्स घरच्यांपेक्षाही जास्त असतो . नवीन गोष्टी ट्राय करायची खुमखुमी देखील असते . एकदा एखाद्या गोष्टीची मज्जा आली की तेच थ्रील परत अनूभवावंसं वाटतं . एकदा मासा गळाला लागला की ती व्यसनाधीन व्यक्ती ड्रग डिलरच्या हातातलं बाहूलं बनते. इथे जर घरच्यांचं दूर्लक्ष झालं की केस हाताबाहेरची होते. तेव्हा जर एखाद्याने सुरूवातच नाही केली , तर अंत वाईट कसा...."


साहेबांनी मधेच माझं बोलणं थांबवलं...स्वारी खुर्चीवर स्थानापन्न झाली ... हातात पेन घेतलं आणि जवळच्या पेपर पॅडवर लिहायला सुरुवात केली . गोंधळी परत गडबडले होते . त्या माणसाने एक अख्खी ऍड एक टाकी ...एका केस हिस्टरी वर लिहून काढली . आम्ही फक्त बघ्यांच्या भूमिकेत होतो . लिहून झाल्यावर त्याने ते सारं आम्हाला वाचून दाखवलं....

हेडलाईन होती ," ड्रगड् इन टू थेफ्ट " ... त्यात एक ओळ होती , जी आजही लागू होते .... " से नो टू ड्रगज् द फर्स्ट टाईम एवरी टाईम " .

त्या कॅम्पेनची सायनिंग लाईन होती...

" फाईट ड्रग अब्युज फाईट टू विन " ! हा ब्रेकथ्रू मिळाल्यावर अख्ख ऍड कॅम्पेन सर्व ताकदीनिशी उभं राह्यलं . ह्या कॅम्पेन मधल्या दोन प्रेस ऍडज् आजही माझ्या इंन्स्टाग्राम अकाऊंट वर आहेत. जाता जाता हे सांगणं अनुषंगाने आलंच की आमच्या सी . इ . ओ . आणि ऍड एजन्सीच्या मालकाला एक लाख प्लस चा चेक घेताना बघून आम्हाला आमच्या टीमचा खूप अभिमान वाटला होता . “ टू बी अ पार्ट ऑफ अ विनिंग टीम इज अ नाईस फिलींग ! ”


... अमिता चव्हाण


.. मोबाईल नं. - ९५६१९६४७०८ व्हाॅट्सऍप नं. - ९९२१७८४०५९

.. स्त्री

.. शहर - पुणे

.. विषय - करिअर आणि कौशल्ये

.. ई-मेल - vu2cav@gmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


230 views2 comments

Recent Posts

See All

2 commenti


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
25 mar 2021

सुंदर लिहिले आहे तुम्ही !

फक्त नकळत इंग्रजी शब्द खूप वापरले गेले.

Mi piace

Ajit Patankar
24 mar 2021

दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती वेळ म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वीचीच! पहिला एकच प्याला-- मग तो कोणत्या का निमित्तानं असेना- ज्यानं एकदा घेतला तो दारूचा कायमचा गुलाम झाला.. : सुधाकर नाटक : एकच प्याला , लेखक: राम गणेश गडकरी.

Mi piace
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page