साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमा | विश्व मराठी परिषद
top of page
WhatsApp Image 2026-03-11 at 16.34.32.jpeg
साखरपा ते धूतपापेश्वर राजापूर जि. रत्नागिरी
१६ मे ते २१ मे २०२६  | ५ रात्री ६ दिवस
५०० वर्षांपूर्वीच्या कोकणाचे विलोभनीय दर्शन...
२००० हून अधिक प्रकारच्या देशी विदेशी वृक्षांची ओळख... बाराही महिने हिरवे गर्द राहणारे खळे... किलबिल पक्षी निरीक्षण... आकाशदर्शन... डोंगरातील पाण्याचे नैसर्गिक रांजण... बारा मावळ प्रमाणे बारा खोऱ्यांचा प्रदेश... कोकणी संस्कृतीचा सापड शिमगा खेळ... देव देवस्की देवी देवतांच्या कथा... युद्ध खेळलेल्या तलवारी आणि भाले... देवराया आणि मंदिरे, ग्रामीण जीवनाची, जीवनपद्धतीची ओळख...मुबलक रानमेवा आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची अनुभूती... ग्रामस्थांबरोबर गप्पा आणि वार्तालाप, प्रख्यात लेखक, साहित्यिकांचा सहवास...
 
आपले जीवन समृद्ध करणारी एक अनवट अनोखी पदभ्रमण परिक्रमा...
माफक व्यवस्था शुल्क: ₹ ४,८००/-
वयोमर्यादा नाही... युवकांना प्राधान्य... तंदुरुस्त प्रकृती आवश्यक
रोजचे १० ते १२ किमी चालणे... 

मर्यादित प्रवेश... त्वरित नोंदणी करा...

सहभागी मान्यवर

१. श्री. अभिजित जोग - प्रख्यात लेखक
२. श्री. रवि मुकुल - ज्येष्ठ मुखपृष्ठकार
​३. डॉ. श्रीपाद जोशी - पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
४. प्रा. क्षितीज पाटुकले - प्रख्यात लेखक, विचारवंत
५. डॉ. अजित आपटे - ज्येष्ठ इतिहासकार
​६. श्री. अनिल कुलकर्णी - अनुबंध प्रकाशन

व्यवस्था शुल्क - रु ४८००/- प्रती व्यक्ती - नोंदणी करताना एकरकमी भरावे लागेल. 
एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणाने रद्द करता येणार नाही. एकदा भरलेले व्यवस्था शुल्क परत केले जाणार नाही. दहा दिवस आधी बदली व्यक्ती देता येईल.

माचाळ :- ५०० वर्षांपूर्वीच्या कोकणाचे विलोभनीय दर्शन, मुचकुंद ऋषींची गुहा, देवराई पाहणे, रात्रीचे आकाशदर्शन
प्रभानवल्ली :- ऐतिहासिक बल्लाळगणेश मंदिर, विलोभनीय खोरनिनको धारण, मुचकुंदी नदीचे उगमस्थान, निसर्गाचे अद्भुत देणे लाभलेले प्रभानवल्ली गाव आणि रम्य असा १२ खोऱ्यांचा प्रदेश.
भांबेड :- हर्द्खळे डोंगर ट्रेकिंग, २००० पेक्षा जास्त प्रजातीचे वृक्ष आणि वनस्पति असणाऱ्या परिसराला भेट, डोंगरातील पाण्याचे नैसर्गिक सात रांजण परिसर दर्शन. 
वाटुळ :- अधिष्ठी रवळनाथ मंदिर, देव देवस्की आणि देवी देवतांच्या कथा, शिवकालीन शस्त्रास्त्रे पाहणे इ.
राजापूर :- पुरातन धूतपापेश्वर मंदिर, राजापूरची बाजारपेठ, इंग्रजांची शिवकालीन वखार, राजापूरची गंगा, उन्हाळे गरम पाण्याचे झरे इ.
कार्यक्रम 
शनिवार दि.१६ मे २०२६ ला साखरपा येथे सकाळी ११:०० वा. रिपोर्टिंग तेथून वाहनाने माचाळकडे प्रयाण.
  • पहिला मुक्काम (१६ मे) - माचाळ
  • दुसरा मुक्काम (१७ मे) - प्रभानवल्ली
  • तिसरा मुक्काम (१८ मे) - भांबेड
  • चौथा मुक्काम (१९ मे) - वाटुळ
  • पाचवा मुक्काम (२० मे) - राजापूर
  • (२१ मे) - धूतपापेश्वर मंदिर राजापूर दुपारी १:०० वाजता भोजनोत्तर परिक्रमा समाप्ती.
    त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करावे. 
दैनंदिन कार्यक्रम 
सकाळी – ०५:३० ते ०६:३० - आन्हिके व स्नान
सकाळी – ०७:०० ते ११:०० -  पदभ्रमण प्रारंभ - रस्त्यामध्ये नाश्ता 
सकाळी – ११:०० वाजता – विश्रांती आणि  भोजन
दुपारी – ०४:०० वाजता - पुन्हा पदभ्रमण प्रारंभ 
संध्याकाळी - ०६:०० वाजता – मुक्कामी पोहचणे 
संध्याकाळी - ०७:०० वाजता – भोजन
रात्री - ०८:०० वाजता – गप्पा, संवाद, कार्यक्रम, सादरीकरण इत्यादि 
रात्री – १०:०० – निद्रा-विश्रांती


टीप:- दैनंदिन कार्यक्रमामध्ये परस्थितीनुसार काही बदल होऊ शकतात.  
नियम व अटी
१. रोज किमान १० ते १२ किमी. पायी चालणे होईल.
२. सुमारे १०० जणांना प्रवेश दिला जाईल. प्रथम नोंदणी प्रथम प्रवेश या तत्त्वाने नोंदणी होईल. नोंदणी करताना सर्व व्यवस्था शुल्क एक रकमी भरावे लागेल.
३. निवासाच्या ठिकाणी राहण्याची सामुदायिक (एकत्रित) स्वरूपाची व्यवस्था आहे. पुरुषांची स्वतंत्र आणि महिलांची स्वतंत्र व्यवस्था असेल. (स्नान व स्वच्छतेसाठी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.)
४. निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार  आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, संवाद, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाण-घेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, असा सर्वसाधारण कार्यक्रम असेल. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत निसर्गरम्य परिसरात रमण्याची, शिकण्याची, आनंददायी अनुभव प्राप्त करणारी हि परिक्रमा आहे. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यातून चालताना तळकोकणाचे अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळेल.
५. निवासाच्या ठिकाणी सतरंजीची व्यवस्था आहे. पांघरण्यासाठी बेडशीट , पातळ चादर आणावी.  आपापले ताट, वाटी चमचा, भांडे स्वतः आणायचे आहे. चहा, नाश्ता आणि कोकणातील स्थानिक शाकाहारी साधे घरगुती भोजन अशी व्यवस्था आहे.
६. परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी शनिवारी दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत साखरपा येथे पोहोचणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःला कोकण रेल्वे, बस/इतर वाहनाने तिथे पोहचता येईल.
७. परिक्रमा संपन्न झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तिला सुमारे २००० शब्दांमध्ये परिक्रमेतील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णन, लेख, कथा अशा प्रकारचे साहित्य लिहावे अशी अपेक्षा आहे. ( सक्ती नाही ) हे लेखन विश्व मराठी परिषदेतर्फे प्रकाशित केले जाईल. 
८. पुणे ते पुणे बस प्रवासासाठी वेगळी व्यवस्था उपलब्ध आहे. ज्यांना पुणे ते पुणे बस ने सोबत यायचे आहे त्यांना जाऊन येऊन सुमारे ३०००/- रुपये अधिक खर्च येईल. हे शुल्क अमित यादव - 9527639287 या क्रमांकावर Gpay ने भरावे, अशी विनंती आहे.
९. न्यायालीन मर्यादा- पुणे शहर न्यायक्षेत्र सीमा. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क

अमित यादव - 9527639287

मधुकर लेंगरे - 9921938237

Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page