।।बालपण।।मित्रांनो प्रत्येकास हवे असते बालपण ,कारण आयुष्यातील खरी मजा त्या वयातच अनुभवलेली असते बालपणात केलेल्या मस्ती ,खोडी,चुका या सर्वांना योग्य शिक्षा वडीलधारी मंडळी कडून मिळून कधी कधी माफी पण मिळायची लहान पण हे प्रत्येकाने अनुभवलेलंच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वेग वेगळ्या परस्तीती नुसार प्रत्येकाने या वयातील मजा लुटलेली आहे


काही गोष्टी मी आपणासर्वाना बालपणातील सांगतो त्या तुम्ही नक्की अनुभवलेली असणार पूर्वी म्हणताना म्हणजे आज पासून पस्तीस वर्षांपूर्वी खाऊ हा शब्द सर्वांच्या मनात ऐकूनच आठवले असेल त्या गोळ्या मग खोबरा,लेमन,श्रीखंड,दूध या प्रकारात मिळत त्याला जोड बिस्किटे ,खारे शेंगदाणे फुटाणे ,लाह्या, कुरमुरे भत्ता हा खाऊ प्रत्येकाने खाल्ला असेलच अन हा खाऊ वाटून खाण्याची मजा म्हणजे एका गोळीत दोन ते तीन जणांनी खाणे ते पण शर्ट मध्ये पकडून त्या गोळीला तोडले जात मित्रांनो ती मजा आजच्या कॅडबरी ला पण नाही आणि दिले तर कोणी घेणार ही नाही किंवा खाणार ही नाही.


पूर्वी रानमेवा पण भरपूर खाण्यात येई आणि सर्वात जास्त मजा तो चोरून खाण्यात होती तो म्हणजे चिंच ,कैरी ,बोरे ,पेरू हे ब्रँड आमच्या आवडीचे खूप मजा अनुभवली.

खेळाच्या बाबतीत गल्लीतीलक्रिकेट,लिंगोरच्या,आबांधोबी ,लपा छुपी ,विष अमृत ,लंगडी ,आंधळी कोशबीर ,गोट्या, भवरे,चलस असे अनेक खेळ विना खर्चाचे बिनदिक्कत मन भरोस्तवर खेळायचो. शिक्षण पण महागडे नव्हते फरशीवर बसून दगडी पाटी पेन्सिल ने शिक्षणाची सुरुवात केली शिक्षक ही त्यांचे काम चोख पार पाडत म्हणूनच आज प्रत्येकाचे पाढे पाट आहे,धडे लक्ष्यात आहे ना कुठल्या ट्युशन ची गरज पडली

मित्रांनो सांगण्यासाठी खूप काही आहे ,परंतू आज आताची परिस्थिती पाहता सगळे उलट आहे मुलांना खाऊ म्हटले तर पिझ्झा,बर्गर आठवते ,शाळा म्हटले तर महागडे स्कुल,पाढे म्हटले तर कॅल्क्युलेटर खेळ म्हटले तर मोबाईल पबजी आठवते आजची परिस्थिती वाईट आहे ,सोशल डिस्टनस पाहिजेच परंतु त्या सोबत आजची बाळ गोपाळ ती कशी हाताळतील हा प्रश्न सतावतोय त्यांच्या बालमनावर काळाने हा घाला टाकून अन्यायच केला आहे असे मी म्हणेन


लहानपण देगा देवा म्हणताना सुद्धा विचार करावा लागेलगणेश पवार ,नाशिक.

मो.नो. :८२७५५१८३६९

Email: pawarganesh163@gmail.com

556 views0 comments