व्हेन यू लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफीपुस्तकं ही ज्ञानाची भांडार असतात. आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यातून सर्वकाही शिकता येते, आचरणात आणता येते, फक्त वाचण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. आपण वाचन केल्यानंतर चांगल्या विचारांची टिप्पणी केली पाहिजे. आपल्या विचारात काही दोष आहेत का की नाही ते आतुरतेने जाणून घेतले पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर आपण आपल्या चांगल्या विचारांची जडणघडण दुसऱ्या चांगल्या मित्रांसमवेत, आपल्या जिवलग व्यक्तींसोबत केली पाहिजे. "पुस्तकात ज्ञान भरलेलं असतं ते अभ्यासाने वाचनाने हस्तगत होत असते " आपण त्या विचारांचे ग्रहण केले पाहिजे. पुस्तकं तुम्हाला खर्याअर्थी आयुष्य जगायला शिकवतात. म्हणायचंच झालं तर ते तुमचं जीवनच बदलून टाकतात. जे आपल्यासाठी अनमोल आहेत त्यांची आपण पूजा केली पाहिजे. प्रत्येक संस्कृतीही आपल्याला हेच सांगते. आपण वह्या पुस्तकांची पुजा फक्त दसऱ्याच्याच दिवशी करतो पण तसं न करता आपण त्यांना साधा नमस्कार तरी करावा. ह्या सर्व खटाटोपीने आपली पुस्तकांवरची श्रद्धा-भक्ती वाढते. ते आपल्याला हवीहवीशी वाटतात. आणि तीच पुस्तकं तुम्हाला अंधारातही दिवा होऊन मदत करतात.


शिर्षक वाचताच तुमच्या मनात खळबळ चालू झाली असेल. "ऑटोबायोग्राफी" म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल लिहिलेले चरित्र. लिहायला वयाची मर्यादा किंवा कोणतीच सीमारेखा नसते. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःचं स्वलिखीत आत्मचरित्र. आपण आपले अनुभव, आपले विचार, आपलं बालपण, तारुण्य आपली सुख-दुःखं, अडथळे निर्मळ मनाने लिखीत स्वरूपात रेखाटत असतो. आत्मचरित्रामध्ये आपण अनुभुवलेले प्रसंग, प्रसंगीक गोष्टी मांडत असतो. आपण जेव्हा स्वतःचं आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्याजवळ आठवणींचा खजिना असतो, अनुभवांची डायरी असते, सुख-दुःखाचे क्षण असतात आणि डोळ्यात आनंदाश्रू.


" व्हेन यु लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफी " म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचं आत्मचरित्र गहाळ करता तेव्हा. हे वाक्य जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्यालाही दुःख वाटते. मेहनतीची मथुरा पाण्यात जाण्यासारखी ही पण एका लेखकासाठी ही गोष्ट आहे. असंच माझ्याही आयुष्यात झालं. माझं सध्या वय एकोणवीस आहे. काहीदिवसांपूर्वी मी एका वयस्कर व्यक्तीशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केलता. त्यांना मी आत्मचरित्र लिहीत आहे असं सांगितले पण माझ्या संभाषणाला त्यांचा नकारार्थी प्रतिसाद/ प्रतिउत्तर मिळालं. त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की आत्मचरित्र हे उतारवयी आयुष्यात लिहावं, थोडक्यात काय तर साठीच्या नंतर. पण माझ्या मते तसं नाही. कारण साठ-पासष्ठी मध्ये आपल्या शरीराचीही घसरण व्हायला लागते. शरीर आपल्याला साथ देत नाही. आपले जेवायचेही वांदे होऊन बसतात. आणि खरंतर माणसाचा क्षणभरायचाची विश्वास नाही. आजकाल वेगवान युगामुळे काहीजण तर पन्नाशीही गाठत नाहीत. ते ह्या जगाचा निरोप घेतात. उतारवयी आपल्याला जास्त काही आठवत नसते. जवळपास जास्तीत जास्त आठवणींचा आपण विचारही करत नाही. म्हणून आपण दैनंदिनी रुपी का होईना, आपल्या आठवणींचा सुख-दुःखांचा खजिना आपण जपला पाहिजे.

माझं लहानपणीच म्हणजे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झाले. प्राथमिक शिक्षण हे आपल्या उच्चशिक्षणाचा पाया असतो. तो जर का भक्कम नसेल तर आयुष्याची इमारतच ढासळते. माझ्या प्राथमिक शिक्षकांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांचे ऋण हे न फिटणारे आहेत. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हास्तरीय शाळेत प्रवेश मिळवला. माझी शाळा ही सैनिकी होती. जेव्हा खाकी सदरा अंगावर घालतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच धमक, वेगळीच ऊर्मी असते. आपल्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो. शाळेला बर्‍यापैकी शुल्क भरावी लागत असल्याने परिस्थिती चटके देत होती. बिकट परिस्थितीमुळे जास्त खर्च किंधा हट्ट पुरवण्याचा प्रश्नच आला नाही. कारण, जन्मल्यापासूनचा अनुभव साथीला होता.


"गरीबीत जन्माला येणं ही चूक नाही,

पण,

गरिबीतच शेवटचा श्वास सोडणं म्हणजे चूक आहे "


आयुष्यात खूप मोठं बनायचा आहे, नाव कमवायचं आहे. अशी जिद्द, चिकाटी, विचार घेऊन मी खेड्यातला मुलगा त्या शाळेत शिकत होतो. त्या वेळेस मला वेगवेगळे वर्गमित्र भेटले. काहींनी साथ दिली तर काहीजणांनी आपला स्वार्थ साधला. वर्गमित्रांनी दिलेला त्रास म्हणजे आपल्यासाठी वाईट गोष्ट नसती. आपण नेहमीच त्याचा सकारात्मकपणे विचार करायचा असतो. मीही तेच केलं आणि स्वतःला पोलादासारखं भक्कम बनवलं. त्या शाळेतील शिक्षक म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. त्यांचा माझ्या आयुष्यात अनमोल वाटा आहे. त्यांचा मी ऋणी आहे. त्यांनी मला मूर्तीप्रमाणे घडवले. कधीकाळी मूर्तीलाही घडवताना घाव सोसावे लागतात तसेच माझ्या आयुष्यातील खूप प्रसंग आले पण जवळपास सगळेच प्रसंग माझ्या हिताचेच होते. मी शालेय शिक्षण देत असताना मला वेगवेगळ्या परीक्षांचं वेढ लागलेले. मी खूप परीक्षा दिल्या. मला त्यातून खूप अनुभव मिळाले.


मी सातवीत असताना वायुदलातील शिक्षकांनी मला दैनंदिनी लिहिण्याचा कानमंत्र दिला. आणि आजही हा कानमंत्र मी काही गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे. हा कानमंत्र म्हणजे आपणच रेखाटलेले आपल्या आयुष्याचं अनोखं सार. मला माझ्या सुख-दुःखात त्यांनी दिलेला हा दैनंदिनीचा कानमंत्र खूप कामी आला. खऱ्याअर्थी ह्या कानमंत्राने माझं आयुष्यच बदलले.


" परिस्थिती कितीही बिकट असो

त्या परिस्थितीशी

दोन हात करण्याची धमक

तुमच्यामध्ये पाहिजे "