हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारला आहे.या पुस्तकाची सुरुवात त्यांनी मातापित्याला स्मरुन केली आहे.अथर्ववेदातिल ओळीं द्वारे सुरूवातीलाच ते सांगतात,
"ही पृथ्वी देवाची आहे.
हे अफाट असीम आकाश त्याचेच आहे.
दोन्ही अफाट अमर्याद समुद्र त्याच्याच हृदयात शांत होतात आणि तरीही लहानश्या तळ्यात तो असतो."
ते एक महान अद्भुत व्यक्तिमत्व होते. विज्ञान क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात प्राविण्य गाजवणारे कलाम खूप संवेदनशील व साधे व्यक्तीमत्व. कलाम हे राष्ट्रपती,वैज्ञानीक आणि इंजिनीअर सुद्धा होते. त्यांचे प्रेरणादायक विचार आजही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अत्यंत लोकप्रिय आहेत. अब्दुल कलाम हे आपल्या कामाप्रति ध्येयनिष्ठ होते. त्यांच्यासाठी कोणतीही वेळ ही कामाचीच वेळ असे. ते आपला अधिकाधिक वेळ कार्यलयातच घालवत असत. त्यांच्या विचारांसोबत त्यांची पुस्तकेही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ सारखे क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले.
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना एकदा गणिताचे शिक्षक श्री रामकृष्ण अय्यर यांनी छडीने मारले ते मनावर घेऊन पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या कलाम यांचे प्रार्थनेच्या वेळी सर्वांदेखत कौतुक करतात आणि म्हणतात" माझ्या छडीचा मार खाणारे पुढे जाऊन मोठीव्यक्ती बनतात.तू देखील फार मोठा होशील." त्यानंतर गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने जोहराने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले.
या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
अतिशय सहजतेने आणि फार सोप्या भाषेत या पुस्तकाची मनोहर्षक शब्दात मांडणी आहे.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्यात पहिली म्हणजे मानसाला दृढ इच्छाशक्ती हवी दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा तिसरी म्हणजे ती पुर्ण होईल असा मनात दृढ विश्वास हवा.
ते म्हणतात प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो, तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो.
संकटे आली दु:ख भोगावी लागली तरी माणसाने धिर सोडू नये,न घाबरता संकटांना सामोरे जावे, आपल्या दु:खांदा समजून घ्यायचा प्रयत्न करावा.संकटे माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात.
अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे.त्यांच्या वडीलांचे मित्र मंदिरात पुजारी होते.त्यामुळे वेद कुराणावरील चर्चा नेहमीच होत असे त्या वातावरणाचा सकारात्मक परीनाम कलामांच्या जीवणावर झाला.त्यांचे विचार प्रबल सकस बनले.
ते म्हणतात,
हृदयापासून,आत्म्या पासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल ती जर तिव्र आणि पवित्र असेल,तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्या मध्ये एकप्रकारची विद्युत चुंबकीय उर्जा असते.आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परतते,अशी ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल, युगानुयुगाच्या या वचनावर तू विश्वास ठेव.रोज सकाळी सुर्य उगवतो,ग्रिष्मा नंतर वसंत अवतरतो हे जितके अटळ आहे तसेच अशी इच्छा पूर्ण होणे हे ही अटळ आहे.तुझी नियती तू जरूर बदलवू शकतो.फक्त ती बदलवू शकतो असा दृढ विश्वास हवा.नियतिचा स्विकार कर, आयुष्याच्या सोबतीने पुढे जा.अपयश विसरून जा, तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नियतीनेच योजले आहे.
तुझ्या अस्तित्वाच्या खर्या हेतुचा तुच शोध घे.अंतर्मनात डोकावून पाहा त्याच्याशी एकरूप हो देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो.सर्व जीवमात्र भासमय भ्रामक कल्पनेसह जन्म घेतात आशा आणि द्वेष या भावनेच्या खेळात गुंतून जातात पण ज्या व्यक्तिच्या हातून नितीमान कृत्ये घडणार असतात पापापासून ज्यांना मुक्ती मिळणार असते ते अश्या भ्रामक द्विधा मनस्थितीतून बाहेर येतात. या सर्व गोष्टींआधी स्वत:चा आदर करा.
पुस्तकाचे नाव : #अग्निपंख
लेखक : #डॉ_ए_पी_जे_अब्दुल_कलाम
परिचय कर्ता : #अंजली_देशमुख_घंटेवार
पुस्तकाची किंमत : २६०₹
#राजहंस_प्रकाशन
#मनांजली देशमुख नागपूर
8669664633
अग्निपंख ह्या डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाविषयी छान माहिती मिळाली. आता पुस्तक वाचायची ओढ लागली.नक्की