युवकांची स्वप्ने आणि समस्या


स्वप्न ते नव्हे जे

झोपल्यानंतर पडतात

तर खरे स्वप्न ते

असतात जे तुम्हाला

पूर्ण केल्याशिवाय

झोपूच देत नाहीतआपले दिवंगत माजी राष्टपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे तरुणांना स्वप्ने पहाण्यास सांगत. त्यांचे म्हणणे होते हे स्वप्न पहातात तेच पूर्ण करण्याची ताकद ठेवतात आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. कारण ती स्वप्नेच त्यांना ध्येयाप्रत नेवून सोडतात.

तसे पlहिले तर स्वप्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहेत. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असो स्वप्नांशी जोडल्या गेलेली असते. प्रत्येकाच्या मनात स्वप्नांची आपली अशी एक दुनिया असते. विश्व् असते. आता त्यातील सगळीच स्वप्ने पूर्ण होतात असे नाही. पण म्हणून माणूस स्वप्न बघण्याचे थांबवतो असे मात्र नाही. मी तर म्हणेन ज्याला स्वप्न पडत नाही तो व्यक्ती किड्यामुंग्यांप्रमाणे अर्थहीन असे आयुष्य जगतो. कारण स्वप्नेच आपल्यात ध्येय , महत्वाकांक्षा,जिद्द, मेहेनत,चिकाटी,हे निर्माण करत असतात. आणि या सगळ्यांचा मुलामा माणसाच्या आयुष्याला नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. कारण शून्यातून विश्व् निर्माण करण्याची ताकद , बळ ही स्वप्नेच पुरवतात.युवकांचे आयुष्य तर बालपणापासूनच स्वप्नांच्या बागेत एखाद्या फुलपाखराप्रमाणे विहरत असते. हळूहळू वयानुसार त्याच्या कक्षा मात्र रुंदावत जातात. स्वप्नांचे इंद्रधनू त्यांच्या आयुष्यात असते. परंतु आताची तरुण पिढी मात्र थोड्याश्याही अपयशाने आणि दुःखाने खचून जाणारी आहे असे आपण पाहतो. फुलांबरोबर काटेही असतात हे ते सोयीस्कररीत्या विसरतात. काही तरी मिळवण्यासाठी, आपले इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी कळ ही सोसावीच लागते;हे मात्र त्यांच्या गावीही नसते. निसर्गातील प्रत्येक घटक नवीन, नूतन काही देण्यासाठी बदलाचे शर अंगावर झेलतो , लोणी तयार होण्यासाठी दह्या दुधाला जसे घुसळावे लागते , वृक्षाला नवी पालवी येण्यासाठी पानझड सोसावी लागते, सोन्याचा दागिना घडवताना त्याला जसे तप्त ज्वालेचा सामना करावा लागतो , एक स्त्री जेव्हा आपल्या उदरात नवीन जीव ठेवते आणि असंख्य वेदना सहन करून पुन्हा जन्म घेते , त्याप्रमाणे काहीतरी साध्य करण्यासाठी झिजावे लागते. हे सूत्रच आजच्या तरुणांना ठाऊक नाही. त्यांना सगळे इन्स्टंट , ताबडतोब , आणि लगेच हवे असते.

आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांना वास्तवाचे रूप न येत त्यातून अनेक अश्या भिषण समस्यांचा उगम होताना आपण पाहतो.परिस्थिती हा भाग महत्वाचा असला तरी महत्वाकांक्षा ही श्रेष्ठ असते . परिस्थिती बदलण्याची ताकत ही मनुष्य मनगटात असते. तेव्हा दैवाला दोष न देत बसता त्याला तोंड देत , त्याच्याशी दोन हात करत मार्ग शोधणाऱ्याला त्याची वाट गवसल्याशिवाय राहत नाही . अशी असंख्य उदाहरणे आपल्याला माहित आहेत .

स्वापरिस्थिती हा भाग महत्वाचा असला तरी महत्वाकांक्षा ही श्रेष्ठ असते. परिस्थती बदलण्याची ताकद ही मनुष्य मनगटात असते. त्यामुळे तिला दोष देत न बसता त्या स्थितीला तोंड देत तिच्याशी दोन हात करत मार्ग शोधणाऱ्याला त्याची वाट गावसल्याशिवाय रहात नाही. अशी असंख्य उदाहरणे आपल्याला माहित आहेत.स्वामी विवेकानंद म्हणायचे आपल्या देशाचा तरुण युवकच सुयोग्य बदल घडवून आणण्याची ताकद आपल्यात ठेवतो. त्यांच्यावर योग्य संस्कार झाल्यास परिपूर्ण, सर्वांगीण विकास झालेली पिढी जन्माला येईल आणि तिच आपल्या देशाचे उज्वल भविष्य घडवील. पण आजचा युवक मात्र चुकीच्या, वाममार्गाला लागून बळी पडत चालला असल्याचे आपण पाहतो. उत्तम गुरु लाभल्याशिवाय त्याचे मार्गदर्शन मिल्याशिवाय त्याचा उद्धार होणे नाही. त्यासाठी युवकाने स्वप्न पाहणे गरजेचे आहे. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आप