ही हि व्यवस्था असावी का ?प्रत्येक समाजात एक व्यवस्था असते आणि त्यात कालानुरूप बदल अपेक्षित असतात. पण ते बदल कसे असावेत ? हा ही एक प्रष्नच आहे. माझे दोन मुलं ,लहाना 4 वर्शाचा तर मोठा 8 वर्शांचा आणि माझे पती ,आम्हा चैघांचा आनंदी व सुखी असा माझा संसार .


रिती रिवाजांनुसार दोघांचीही पाने वाढली.माझ्या पतींनी यथायोग्य पुजाविधी आटोपला व आम्ही चैघांनीही पानास नमस्कार केला. आता पर्यंत षांत पणे बघत असणा-या माझ्या लहान मुलाच्या मनांत अनेक प्रष्न निर्मांण झाले.तसा त्याने आम्हाला एक प्रष्न विचारला ,आपण आजच का बरे आजीआबांना जेवु घातले. ते तर येथे जेवायला आले देखिल नाही.तुम्हीच तर म्हणाला होता की ते देवाघरी गेलेत आणि आता ते आपल्याला कधीही दिसणार नाहीत? पण मला तर त्यांची खुप आठवण येत आहे.असे म्हणुन तो रडायला लागला.परंतु त्याची थेडीफार समजुत घालण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो पण तो काही केल्या एैकत नव्हता.म्हणुन माझ्या पतींनी उदया सकाळी आपण कोल्हापुरच्या आजीआबांना भेटायला जाउ.तेथे तुला खुप मजा येईल .असे आष्वासन दिल्यावर तो षांत झाला व लगेच झोपी गेला. पहाटे आम्ही चैघेही लवकर उठुन आमच्याच चारचाकी गाडीने प्रवासास लागलो.


मी माहेरी जात असल्यामुळे मी तर आनंदात होतेच पण माझी मुलं देखिल अतिषय आनंदात होती .तसेच माझे पतीदेखील दोन चार दिवस निवांतपणे राहता येईल व तेथिल असलेल्या षेतामधे जाता येईल. या आनंदात होते.काही तासातच आम्ही कोल्हापुरात येउन पोहचलो.तषी आमची गाडी घरी न जाता आपोआप देवी श्री महालक्ष्मीच्या मंदिरा समोर येउन उभी झाली.तेथिल वातावरणातील ती प्रसंन्नता बघुन आम्ही ताजेतवाने झालो आणि देविचे ते तेज बघुन आम्ही भाराउन गेलो कारण तिचे रूप नेहमीच वेगळे भासते .आम्ही चैघांनीही महालक्ष्मीचे खडया आवाजात स्तोत्र म्हटले.मी तिची ओटी भरली आणि आम्ही प्रसाद घेउन घराकडे निघालो. घरी येउन पोहचताच माझी आई दारातचं आरतीचे ताट घेउन उभी होती पहीला मानं जावयाचा म्हणुन आईने आधी माझ्या पतीला ओवाळले नंतर आम्हालां . या वर माझा लहान मुलगा लगेच म्हणाला की आजी तु आरतीचे ताट घेउन आमची आरती का केलीस? आपण तर देवाचीच आरती करतो.त्याच्या या प्रष्नावरं आईबाबांनी एकत्रच उत्तर दिले .ते मिष्किल पणे म्हणाले कि आज आम्हाला देवाची आरती करण्याची गरजंच नाही.कारण सकाळी सकाळीच आम्हाला बाल गोपालांचं दर्षन झाले .यावर लहाना लगेच आजीला म्हणाला की आजी मला श्रीकृश्णा सारखेच दही दुध आणि लोणी देषील .या वर आम्ही सगळेच हसलो आणि हासतच धरात प्रवेष केला.आंत गेल्यानंतर बाबांनी आईला सांगीतले की चल लवकर आटप तुझे नातु मुलगी आणि जावई प्रवासाने दमले आहे. गप्पा नंतर आधि काही फराळाचे बघ.देवघरातुन सुंदर सुवास येत होता लगबगीने आम्ही हात पाय घुतले देवघरात देवाचे दर्षन घेतले आईबाबांना नमस्कार केला आणि आम्ही सर्वांनी चहाफराळ केला.मी आईच्या मदतीला गेली मुलं खेळण्यांत दंग झाली व माझें बाबा अणि पती षेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले.


दोन दिवसांनंतर मी घरी नसतांना माझ्या बाबांचे मित्र दामु काका आणि सुमित्रा काकु आम्हाला भेटण्यासाठी म्हणुन व नातवाच्या ओढीने आमच्या घरी आले . आल्या आल्याच आईबाबांषी न बोलतां माझ्या मुलांषी गप्पा करू लागले. या वर माझी मुलं आजींला विचारत होते की आजी हे दोघे कोण आहेंत? या वर दामु काका आणि सुमित्रा काकु म्हणाले की आम्ही देखिल तुमचे आजीआजोबाच आहोत.तुमची आई आम्हाला आमच्या मुली सारखीच आहे. या बाळांनो आमच्या जवळ या आणि आम्ही आणलेला खाउ घ्या. मुलांनी आजीकडे पाहीले व आईने नजरेनेंच होकार दिला म्हणुन दोघांनीही खाउ घेतला.काही वेळांनी दोघांची दामु काका काकुंषी चांगली गटटी जमली आणि मुलांनी प्रष्न विचारायला सुरूवात केली त्यावर काका काकु देखिल हसत मुखांने प्रत्येक प्रष्नांची उत्तरे देत होते आणि सरते षेवटी काका काकुंकडे गोंश्टींची मागणी झाली.त्यांची गोश्टीची मागणी पुर्ण करून काका काकु पोरांषी खेळण्या करीता उदया परत येईन असे सांगुन निघाले. मी घरी आल्यानंतर दोनही मुले अतिषय आनंदात होती. मी दिसताक्षणी दोघेही माझ्या जवळ आली आणि म्हणाली की,आई आज आपल्या घरी दुसरे पण आजीआजोबा आले होते.त्यांनी आमच्या साठी खाउ आणला,त्यांनी आम्हाला गोश्ट सांगीतली .आज आम्ही सर्वांनीच खुप धमाल केली. असे म्हणुन दोघेही निघुन गेले.मी आईला विचारले कोण आले होते? आई म्हणाली की तुझे दामुकाका काकु आले होते.हे एैकताच मला दामु काका व काकुंची आणि त्यांच्या एकटे पणाची तिव्रतेने आठवण झाली.होय त्यांची मुलं काकाकाकुंना त्यांच्या उतार वयात त्यांना ऐकटे टाकुन परदेषात निघुन गेले होते.काका काकुंनी त्यांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.आणि म्हणुनच त्यांना मुलाबाळासह नातवंडांची खुप आठवण येते.अषा परीस्तितीत मी किंवा गावातील कोणीही आपल्या मुलांसोबत गावांत आलं की काकाकाकुंना अतिषय आनंद होतो.आणि प्रेत्येक लहान मुलांत त्यांना आपली नातवंडच दिसतात.अािण मी जरा जास्तच लाडाची असल्यामुळें काकाकाकु माझ्यावर सख्या मुलीसारखे प्रेम करतात आणि माझ्या मुलांवर त्यांची विषेश मर्जी आहे आणि माझ्या पतींवर आपल्या सख्या जावया प्रमाणे प्रेम करतात.


चार दिवसांचा मुक्काम संपवुन परतण्याची तयारी सुरू होती. आता आमची गाडी सामानाने गच्च भरली हाती .लहान्याला मात्र भेटवस्तु गिप्टपॅक उघडुन पाहण्याची जरा जास्तच घाई झाली होती.परंतु त्याला सक्त ताकीद मिळाल्यामुळे तो षांत होता आणि घर कधी जवळ येईल याची तो आतुरतेने वाट पहात होता.व आम्ही सगळे देखिल आठवणींच्या गप्पांमधे रममान झालो होतो . इतक्यात माझे लक्ष एका पाटी कडे गेले आणि ते नाव वाचुन मी अस्वस्थ झाले आणि गाडी थांबवायला सांगुन आम्ही सगळेच खाली उतरलो.माझ्या मुलाने मला लगेच विचारले की आई आपण इथे का थांबलो ? या वर माझ्या पतींनेच उत्तर दिले की मुलांनो याला वृध्दाश्रम असे म्हणतात.आणि मुलांचा दुसरा प्रष्न येण्याच्या आधिच वृध्दाश्रम म्हणजे असे आजीआजोबा ज्यांना काही कारणास्तव त्यांच्या मुलांनी इथे आणुन ठेवले आहे.आणि येथिल सर्वच आजीआजोबा तुमच्या सारख्या गोड अषा नातवंडांना भेटण्यास उत्सुक असतात.अषी सर्व माहीती माझ्या मिस्टरांनी मुलांना दिली.या वर परत लहान्याने प्रष्न केला की आईबाबा म्हणजे इथे आमच्या षाळेसारखीच येथिल सर्व आजीआजोबांची षाळा भरते का ? या वर आम्ही काहीही उत्तर