top of page

व्यसनमुक्ती



खूप दिवस झाले या विषयावर लिहायचा विचार करत होते पण, पण नेमक्या कोणत्या शब्दात ते व्यक्त करावेत हे समजत नव्हते.

जीवनात खूप सार्‍या घटना मनाला समाधान देणाऱ्या ठरतात.खूप सार्‍या गोष्टीतून आपण आपला आनंद शोधत असतो अगदी एखादा समारंभ वाढदिवस ..लग्न ..किंवा मॅरेज एनिवर्सरी अगदी कितीतरी प्रसंग.... आहेत. खूप सारे सण आहेत... जे आपल्या आनंदात भर घालतात अगदी त्याप्रमाणे खूप साऱ्या दुःखद ...घटना ..ही असतात कधी एखादी आर्थिक अडचण असेल... किंवा एखादा मानसिक खच्चीकरण करणारा प्रसंग ...कुणाचे अकस्मात निधन असेल ...अगदी कितीतरी प्रसंग... आपल्या आयुष्यात येतात पण तरीही या सगळ्या गोष्टींचा एक common...समान धागा आहे ...ती घटना... ती गोष्ट व्यक्त करण्याचा .... स्वतःचा आनंद वाढवण्याचा किंवा दुःखाचं दहन करण्याचा, आणि आजकाल तर तो इतका साधा आहे की ..बस विचारायला नको "खुशी बरदाश करने के लिए... या गम भुलाने के लिए" ...ग्लास 🍻तर खनकलेच... पाहिजेत ना🥂🍻 चिअर्स.... तर व्हायलाच हवं ना!! Is it.. Important. खरंच इतकी गरज आहे का त्या ग्लासची... 🥂आनंद द्विगुणित करण्यासाठी ....किंवा मग दुःखाचं परिमार्जन करण्यासाठी .... !!

आजकाल तर success पार्टी त्याशिवाय अपूर्णच आहे.!

"Alcohol is dangerous to health" हे माहित असताना सुद्धा, मद्यप्राशन करणं आणि ते रिचवणे यात एक एक वेगळीच मजा असेल... !!?? किंबहुना त्यामुळेच तर खूप सारे आकर्षित होत असतील ...high प्रोफाईल किंवा लो क्लास सगळ्यांच्या जीवनाचा तो एक अविभाज्य घटक...!! हा त्यातून मध्यमवर्ग बाजूला आहे अशातला भाग नाही ..!पण ते कधीकधी... 31 डिसेंबर ...गटारी अमावस्या... किंवा मग विकली सेलिब्रेशन... Saturday.. Sunday ...या तत्वावर ते... आपली तहान भागवत असतात. मग, तेच Saturday.. Sunday... कधी त्यांचे every day होतात हे त्यांना समजत नाही. occasionly चे regular ....candidate कधी होतात हा खरच गहन प्रश्न?

मग मात्र आम्ही कंट्रोलमध्ये आहोत या भ्रमात आयुष्यभर जगतात.

"डकवर्थ-लुईस "च्या नियमांचा वापर मग कसा काय सुरू होतो की "Law oF parsimony"(occam's theory ) जीवनात वापरली तरी चालते हेच ते विसरतात.

so called officers लाच घेतल्याप्रमाणे सर्वसमावेशक पणे पार्टी ... एन्जॉय करतात. आणि स्वतःच्या control mechanism. ला challenge करतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. अस असतानासुद्धा पिकांच्या जेवढ्या (variety) विविधताआढळणार नाही एवढे अल्कोहोलचे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत Brandy... Wishky... Rum... Wine.. Beer ... Gin... Cidar...vodaka... And so on... आता तुम्हा वाचकांना वाटेल लेखक चांगलाच मुरलेला दिसतोय पण "जो ना देखे रवि (sun) वो देखे कवी "या उक्तीप्रमाणे मी एक Microbiologist आहे आणि एक लेखक सुद्धा... त्यामुळे अगदी Alcohol procedure... Extraction... Purification... Packaging... SOP... प्रत्यक्षात माहित आहे (मागे एकदा गोव्याला जाण्याचा योग आला तेव्हा कळाले.)

"रोज लागणार भाजीपाला फळे असा उघड्यावर रस्त्यावर विकायचा आणि मद्य मात्र पॅक करून ...लेबल लावून ...शोकेस मध्ये विकायचं हाच तर खरा संस्कृतीचां ...आणि संस्कारांचा... विरोधाभास...आहे.!!"

Evolution theory नुसार पृथ्वीवर आधी पाणी निर्माण झालं ,आणि मग सजीव सृष्टी अस्तित्वात आली .अल्कोहोल जर तितकंच गरजेचं असतं तर मग तेव्हा निर्माण झालं असतं की?..नाही!! ...

पण... निर्माण झालाही असेल... तुम्हाला काय माहित असं म्हणणारे महाभाग.. या पृथ्वीवर कमी नाहीत. तर त्यांनी पुन्हा एकदा मिलर (Miller experiment )एक्सपेरिमेंट अभ्यास करण्याची गरज आहे. असं मला वाटतं .

मला इथं मद्याचे दुष्परिणाम.. किंवा परिणाम ...या विषयावर चर्चा नाही करायची. पण स्वतःचा मेंदू असा पाच ते आठ तास.. किंबहुना कमी अधिक तास झिंगत ठेवण्यात कसला आलाय शहाणपणा ??

चला बसुया ..किंवा मग कधी बसायचं ...असं म्हणत बसल्याजागी ...हवेत तरंगत राहायचं हेच का ते परमसुख!!!

माणसाला हवेत उडता येत हे विमानाचा शोध लावून "राइट बंधूंनी " केव्हाच सिद्ध केलंय पण अस drinks करुन हवेत रोज तरंगत राहणाऱ्या लोकांना नेमकं काय सिद्ध करायचंय हा एक मोठा प्रश्नच आहे.

वस्तुतः पुरुषांना जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात, असं समजणाऱ्या पुरुषांचे मद्यप्राशन प्रमाण जास्त आहे अजूनही भारतीय स्त्रिया तितक्या व्यसनाधीन नाहीत( अर्थात त्यालाही अपवाद आहेत. )

आज कालच्या युवापिढीला व्यसनांपासून परावृत्त करणे, खरंच कठीण आहे .कारण हे-व्यसन टीनेज (teenage) पासून असेल तर त्यांच्या वयाची चाळीशी... येईपर्यंत ते रसातळाला ..गेलेले असतात. आणि जर हे व्यसन मधेच कधीतरी style ..म्हणून सुरू असेल तर.. त्या Lebeled बाटलीत आपण केव्हा बंद झालो हेच कळायला उशीर होतो ... मग लेबल बदलत... जातात आणि आपण. . त्या बाटलीत पुरते... अडकतो.

" फिक्र को धुआँ मैं उडा ना ही जिंदगी है !"समजणारे " ड्रिंक नही... तो स्मोकिंग ..ही सही" अशांची ही काही कमतरता नाही. असे सगळेच व्यक्ती पूर्णतः देवदास नसतात हे ही तितकच खरं....!

व्यसनमुक्ती काळाची गरज असली ,तरी आपली व्यसनाधीनता नेमक्या कोणत्या स्तरावर आहे हे ओळखणे महाकठीण!! ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या आजाराच्या विविध stage आहेत.त्या नेमक्या सांगता येतात cell cycle मध्ये सुद्धा प्रत्येक phase मायक्रोस्कोप मध्ये (observed) निरीक्षण करता येते fossils ना सुद्धा carbon dating करून वय आणि वर्ष ठरवता येतं. पण..आम्ही. कंट्रोलमध्ये आहोत! आम्ही काय रोज थोडेच घेतो !! यांची स्टेज ओळखणं फार अवघड !!!

ज्याप्रमाणे मला काही झालं नाही ..असं समजणाऱ्यांना उपचार करणं कठीण... प्रत्येक वेळी Regular complete blood count (CBC) test करून रोगाचे निदान होईल असं नाही ना!! त्यामुळे योग्य उपचारासाठी योग्य लक्षण तरी दिसायला हवेत ना !!पण आजकाल "शालीन ते ची शाल पांघरलेल्या ना कसे ओळखावे" ??

खरंच आठवड्यातून.. किंवा महिन्यातून... एकदा तरी बसलं पाहिजे का ??विचारा स्वतःला कधीतरी असा प्रश्न.... आणि त्याचे उत्तर खरच होय !!असेल तर मग प्रायोगिक तत्वावर तुमचा उपचार गरजेचा आहे . तुमचा देवदास होण्याआधी!!!

मी कंट्रोल मध्ये आहे असे म्हणून भावी पिढी वर आपण नेमके कोणते संस्कार करतोय ?हेच ते विसरून जातात आणि त्यांनी ... Liver metabolism ची biochemistry केव्हाच गिलंकृत केलेली असते .

तर मुद्दा हा आहे की.. व्यसनमुक्तीसाठी... आधी स्वतः मधली व्यसनाधीनता ओळखता यायला हवी ,व्यसन मग ते कोणतेही असो जे व्यसन ...आत्म विकासासाठी नाही ...किव्हा समाज उन्नतीसाठी नाही.... त्यावर उपाय केलेलेच बरे !!

माझा हा लेख वाचून एखादा महाभाग जरी स्वतः स्वतःची स्टेज ओळखू शकला तरी खूप झालं .

आता आम्ही काय ड्रिंक्स स्मोक करून लगेच उद्या मरणार आहे का ? कितीतरी रोज मरतात व्यसन न करता सुद्धा असा विचार करणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही पण... पण... त्या ... मरणात... सुद्धा काही" शान "(shine) असावी कि नाही.

"Thirty Sixty Ninety अशा स्वरूपात EMI( tax pay)

भरून देशाची सेवा करणाऱ्यांना... कदाचित... देशसेवा करण्याचे अजून बरेच चांगले मार्ग आहेत हे माहित नसावे "Hope you understand ...what I mean.... You better understand...!!

ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला कडुनिंबाचे औषधी गुणधर्म पोटात जावे म्हणून गुळ मिश्रित कडुलिंब खाण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे लेखणी कितीही धारदार असली तरी, प्रसंगी ज्वलंत ..आणि समाज प्रबोधक विचार मांडताना लेखकाला लेखणी थोडी बोथट करावी लागते !!तर... आणि तरच ...सामाजिक (controversy) वाद न होता लेखकाचा अपेक्षित विचार समाजापर्यंत पोहोचतो ,आणि म्हणूनच हा एक साखर मिश्रित मिश्किल लेख!!!

प्रस्तुत लेख हा काल्पनिक नसून सत्याला -स्पर्श करणारा ..आणि सत्य प्रकाशात आणणारा आहे.. या लेखात एक ज्वलंत प्रश्न तितक्याच मिश्किल पणे.. हाताळण्याचा लेखकाचा हेतू समाज प्रबोधनाचा आहे. व्यक्तिशः कुणाला दुखावल्यास क्षमस्व!!!

पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लेखात एक नवीन विषय घेऊन till ...then take care..!!



लेखिका: स्वाती प्रवीण पवार

मो: 7066595794


👍 लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

301 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comentários


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page