( कोरोनामुळे वारी खंडित झालेल्या भक्ताची व्यथा..)
टाळ नाही, मृदंग नाही
नाही झाले रिंगण,
भाबळे आम्ही भक्त तुजला
करतो घरूनी वंदन.
तुकोबा संग माऊली
भेटी तुझ्या आले,
वारकऱ्यांना आज मात्र
ओढ तुझिया लागे.
नाही मानाचा अश्व आज
नाही सोहळा पालखीचा,
धन्य मानून घे विठ्ठला
हा नमस्कार तुझ्या भक्तांचा.
नाही कीर्तनाचा गजर
नाही जप हरिपाठाचा,
एकमेका जीव वाचवे
हा प्रयत्न साऱ्या भक्तांचा.
हात सोडून कटेवरचे
धाव घे रे विठ्ठला,
विटेवरून उतरून एकदा
तूच येशील का रे भेटीला....
विटेवरून उतरून एकदा
तूच येशील का रे भेटीला..
कवी: प्रसाद युवराज चौधरी (जळगांव)
( कल्पराज )
मो.नं.: 7038814602
ईमेल: prasad.chaudhari0410@gmail.com
अप्रतिम, फार छान