सण असावे सणां सारखे
नकोत नुसत्या रीती
त्यात असावा आनंद सोहळा
नकोत नुसत्या पंक्ती
परंपरांनाही अर्थ असावा
नकोत नुसत्या रूढी
तर्क जुळावेत परंपरांचे
व्हावी आरोग्याची नांदी
त्या उत्सवांचा अर्थ कळवा
नकोच नुसती गर्दी
उत्सवातुन प्रबोधन व्हावे
हीच खरी संस्कृती
त्या सोहळयांचे ही सार्थक व्हावे
न खुंटावी मती
विज्ञानाशी सांगड असावी
पण देवा वरही भक्ती
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
कवी : मेहुल मंगेश भिडे (ठाणे)
मो: 8879154830
ईमेल: mehulbhide1230@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comments