top of page

तुम न जाने किस जहाँ में खों गये




तुम न जाने किस जहाँ में खों गये

हम अकेले तन्हा रहे गयें...

समोर असणारी माणसें हरवतात, काही तात्पुरती काही कायमचं जातात का?

जें जायला पाहिजे ते जात नाहीत. छळणारेंच छळतअसतात. तेच छळंतच राहतात. सगळ्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत नाही.

माणसे जातात म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर करून जातात. अस्तित्वासाठी कात टाकल्या प्रमाणे माणसांना सोडावं लागतं.



तेरा जना दिल कें अर्मानोंका लुट जानांच अस्तं.

थांब माझ्या लेकराला न्हाऊं घालू दें म्हणंत अनेकांनी आपलं पोषण केलेलं असतं.

माणसें ठसा उमटवून जातात माणसे वसा देऊन जातात. माणसें पाऊल वाट निर्माण करतात.

माणसें प्रेम करतात, माणसें द्वेष करतात. माणसे जाळतात, माणसे जळतांत. माणसे अनंत असतात, अनंत स्वभावाची असतात, शेवटी अनंतातच विलीन होतात. एखाद्याचं काही जणांच्या असण्यानें जीवन समृद्ध होतं. भरलेलं वाटतं.त्यांच जाणं सहनंच होत नाही.



मिनाकुमारी गेलीं की दर्द भरी दास्तां आठवतें. विजय तेंडुलकर गेले की जीवनातलं नाट्य आठवतं. दिवाकर गेले की नाट्यछटा आठवतात. पुलं की विनोद आठवतो. वपू गेले की वपुर्झा आठवतो. दुर्बोध कविता हल्ली दुर्मिळ झाली. त्यामुळे कवितेतच ग्रेस राहिला नाही.

प्रत्येकाच्या एक पाऊस असतो, त्यांनी आपल्याला कधी ना कधी भिजवलेलं असतं. ज्या आठवणीत आपण भिजतों त्याच लक्षात राहतात. आठवणीच आपल्या लाला अंकुरित करतात, स्वतःतून उमलाला भाग पाडतात. माणसांचे फुलासारखं आहे़. उमललीं नाही की कोमेजून जातात. ऊमलण्याचे प्रसंग असतील तरच फुलें कोमेजत नाहीत. माणसांचेही असंच आहे. अनेकांच्या आठवणीनेच माणसें उमलतात,बहरतात.



बाबा सारखा कल्पवृक्ष अनेकांनी आपल्या अंगणात लावलेला असतों. एखाद्याच्या जाण्याने जीवनातलं नाट्य संपतं, जीवनातलं संगीत सपतं, जीवनातला संवाद सपतो. ति येते आणिक जातें याच्यातच जीवनाचा सर्व आवाका असतो का? समोर असणारी माणसें सापडत नाहीत.ओळखू येत नाहीत. ओळख दाखवत नाहीत. कुठे गेलीं लताची दर्द भरी गाणीं. तलत,के.एल सैगल दुःख देऊन हस्ते जखम देऊन गेले. जमा ईलाही हे सुगंधी जखमा देऊन गेले. सुरेश भटांनी जगण्यातलं छळणंअधोरेखित केलं. सरणावर सुटका होते हे जाणवून दिलं. कळतं सगळं पण वळण्यासाठी कुणीतरी

हवं असतं. सगळेच हरवलें, हरवत चाललेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे. पावलावर पाऊल टाकले की रस्ता सुकर होतो. जाणाऱ्याने पाऊलवाट निर्माण करायची असतें. सामान्यांनी पाऊलवाटेवरून चालायच असतं. म्हणजे रस्ता चुकत नाही. गालीबचं दालन अजून आम्ही पूर्ण कुठें उघडलं आहे?



आपल्याकडे समृद्ध वारसा आहे याचा एक अभिमान असतो,तोच जगण्यासाठी पुरेसा असतो. कुणी न कुणी कोणासाठी तरी निमित्त असतं, जगण्यासाठी. माणसे गेली तरीही घडवून जातात.

आत्मनिर्भर करून जातात.

काही पुस्तके नुस्तीच वाचायची काही नुसतिच करमणुकीसाठी, काही विरंगुळ्यासाठी काही, अभ्यासासाठी, काही निष्कर्षा साठी, काही चिंतन, मनन करण्यासाठी, काही पारायण करण्यासाठी. पुस्तकांची आणि माणसांची उपयुक्तता कधीच संपत नाही. पुस्तकें आणि माणसें सारखी सारखी वाचलीं पाहिजेत, नव्या संदर्भात. वाचाल तरंच घडांल



एकलव्य व्हायची तयारी असली की द्रोणाचार्य भेटतांतच. अनुकरणानेच माणसें शिकतात. आपण निसर्गाचे अनुकरण करतों पैसे कुठे द्यावे लागतात?

दुसऱ्यांच्या विचारावर आचारांवर आपले पालनपोषण होते, पैसे कुठे द्यावे लागतात.

मुळांसारखं गाभ्या पर्यंत जाता यायला हवं. खूप लोक गेलें. कुणी नक्षत्राचे चांदणं देऊन गेले, कुणी शरदाचे चांदणे देऊन गेले. प्रत्येकाचं देणंआपलं संचित असतं. वारसां नावाचा आरसांच आपल्याला जिवंत ठेवतो.

आपला स्वयंमूल्यमापन करतो, आपल्याला प्रेरणा देतो.



तुम्ही गेल्यावरच कळालें, आम्ही कुणाकडून शिकलो? कसे शिकलो? कोणी आम्हाला वाढविलें, आमचे अस्तित्व दखलपात्र तुम्हीच केलें, तुम्हीच आम्हालाओळख दिली. तुम्ही आणि तुमच्यासारखें दृष्य,अदृष्य ज्यांनी आम्हाला घडविलें. तुम्ही आज नसलां तरीही,

सोहळा वैभव आहे, ते तुमचंच आहे. रक्तातून तर फार प्रचंड वाहतंच. अनुवंशिकतेचे झरे कधीच आटत नाहीत. त्यांना जिवंत ठेवणं आपलं काम आहे. निरीक्षणातूनही फार प्रचंड आपल्याला मिळतं.

पूर्वजांचे हावभाव, हेवेदावें हातवारे, वागण्याची पद्धत, आवाज, विचार हे सगळं आपल्याला वारसा म्हणून मिळालेला असतं. वारसा समृद्ध असला तरीही आरसा प्रमाण मानायचा.सोडून गेलेल्यांच्या भांडवलावरंच आपण जगतों. अनेकांचा ठेवां आम्हाला अजून माहीतच नाही. समृद्ध संस्कृतीची अजून आमची ओळख तरी कुठें झाली आहे? म्हणून तर miles to go before I sleep प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपली ही मूर्ती कोणाच्या तरी मन मंदिरात वास्तव्यं करावी अशी आपलीही इच्छा असते. हे सगळें ऋणानुबंधच तन्हां पासून आपल्या ला वाचतात.मग काळजी कशाला करायची?




डॉ.अनिल कुलकर्णी

Email.: anilkulkarni666@gmail.com



ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

46 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page