तुळशीचा शुभ विवाह आज करुया मुरलीधरा संगती
लक्ष्मी विष्णू पुनश्च आज बनले या जन्मीचे सोबती
हाती घेऊनि अक्षता उधळुया तुळशी मुरारिंवरी
जन्मोजन्मी अशीच प्रीत असुद्या लक्ष्मी आईच्या वरी.
शुभमंगल सावधान -----------
जन्मोजन्मी असाच आम्ही करितो हा सोहळा साजिरा
वृंदा साजिरी गोजिरी वधु पहा शोधीतसे प्रभुवरा
वृंदा विष्णुप्रिया सतेज तुळशी तुम्हास अर्पियतो
ठेवा दृष्टि कृपेचि हो प्रभूवरा तुम्हासि प्रार्थीयतो
शुभमंगल सावधान -----------
(वरील मंगलाष्टक नेहमीच्या मंगलाष्टकाच्याच चालीमध्ये
म्हणायचे आहे. वृत्त - शार्दूलविक्रीडित)
त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह होतात तरी आपणाकडे तुलसी विवाह असल्यास आपण विवाहासाठी ही मंगलाष्टक म्हणावी आणि आवडल्यास आम्हाला तसे कळवावे.
सौ. उमा जोशी,
फोन 020 25468213
मोबा.9420176429.
anantjoshi2510@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Commentaires