top of page

पक्षांचे घरटे
सुंदर नाजूक हिरव्यागार कोवळ्या पानांचे झाड, घरटे बांधण्या निवडले पक्षाच्या एका जोडीने आपल्या पसंतीचे !

लगबग सुरू झाली मग त्या दोघांची सुंदर घरटे बांधण्यासाठी, सामानांची

जुळवा-जुळव करण्या घरट्याचे !!
आळीपाळीने, दूरवरूनी रूचेल तो सावरीचा कापूस शोधूनी आणती चोचींमधूनी, तयार करण्या घरटे, पिल्लासाठी आपल्या छान !

चोचीमध्ये घेऊनी कापूस, धागा करोनी त्याचा, एक पानातूनी दुसर्‍या पानात, विणत जाई आडवा-तिडवा धागा काढून !!
कष्टाने आपल्या साजेसा आकार देऊनी घरट्याला, दोघांच्या प्रेमाचे प्रतिक उभारूनी, स्थापत्यकलेचा दाखविती नमुना सुंदर !

त्या घरट्यात मुलायम गवत अन कापसाची गादी अंथरती, जन्माला येणाऱ्या आपल्या नवजात पिल्लांसाठी भारी !!
नर-मादी सुखावून जाती, घरटे पाहूनी आपले श्रमाचे, संयोगातून दोघांच्या एके दिवशी तीन गोंडस पिल्लांचा जन्म होई !

मादी पिल्लांचे संरक्षण करण्या घरट्यात बसे, अन नरपक्षी जोडीदारीणीसाठी आपल्या दाणे टिपण्या घरट्याबाहेर जाई !!
पिल्ले हळूहळू वाढू लागताच, मादीही पिल्लांसाठी किटकांचे भक्ष शोधण्या घरट्याबाहेर पडून, खाद्य आणू लागली !

भूकेने व्याकुळ असता, मातेची आतुरतेने प्रतिक्षा करती, चाहूल लागताच तिची चोंच उघडूनी भक्ष गिळंकृत करण्या आतुर झाली !!
पंखामध्ये येता बळ, दूर उडूनी जातील आपापल्या दिशेने पिल्ले सारी, आकाशी झेप घेण्या स्वबळावरी !

मानवजातीस, शिकवूनी जाती मोलाची शिकवण, कर्तव्यात नसावा कसूर आपल्या परि कधी न अडकावे मायेच्या पदरी !!
पुष्पा सामंत.

नाशिक 22-3-2021.

Email.: Samant1951@hotmail.comही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

512 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page