तुझे वेड लागू दे मला
आणिक काय मागू मी तुला , रे विठ्ठला ॥धृ॥
नको सोने ,चांदी , नको नाम वैभव
मुखी, माझ्या असू दे, सदा तुझे नाव
तुझ्या नावाचे ,वेड, लागू दे मला ,रे विठ्ठला ॥१॥
काय घेऊनी आलो , मी,काय घेऊन जाणार
तुझ्या साठी विठठला मी, अजन्म गाणार
तुझ्या गाण्याचे ,वेड ,लागू दे मला , रे विठठला ॥२॥
नको मोह - माया , नको हा पसारा
कशा साठी देवा, खेळ हा सारा
या खेळाची, दुनिया लई न्यारी , रे विठठला ॥३॥
नको अंत पाहू, घे समजून मजला
आलो, मी पामर, तुझ्या दर्शनाला
तुझ्या दर्शनाचे ,वेड ,लागू दे मला, रे विठठला ॥४॥
तुझे रूप , विठठला ,पाहू दे मला,
नको, अन्य काही ,तुजविण मजला
तुझ्या रूपाचे ,गोडवे ,गाऊ दे मला ,रे विठठला ॥ ५॥
लेखक - अशोक कुमावत
भ्रमणध्वनि - ९९६९५८४९६६
मुंबई -मालाड (पूर्व )
Email: ashokkumawat010@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
コメント