top of page

स्त्रीत्वाची झूल


ree

लहानपणी अबोध कन्या मुलीने मुलीसारखे वागायचे. आई वडिलांचे ऐकायचे.... मुलीची जात असल्यामुळे कन्यारेषा पाळत राहिले मुलगी म्हणून जगत गेले!....

विवाह बंधनात अडकले. पतीरांजाचा हुकुम मानत राहिले. त्यांचेच घर, त्यांची मर्जी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सर्वस्व मानून स्त्री म्हणून जगले!... सार्‍याच्या आवडी निवडी जीवनात जपता जपता आयुष्य जगायचे विसरले. मुलांसाठी आनंदात जगता जगता संसारात आनंदक्षण फुलवत स्त्रीपण अंगावर ओढून जगले!... आता दुसर्‍याच्या मनाची काळजी करत करत ओठ गच्च मिटूनमुळमुळीत वागायच नाही ठरवलं! घर संसार सांभाळता सांभाळता स्वतःचे व्यक्तीमत्व हरवलं स्वतःचे अस्तित्व हरवलं !... मनातून जाणवायला लागले मनाला प्रश्न सतावू लागले तू फक्त घरासाठी जगतेस . तू तुझ्याकरिता जगतेस कां? तू फक्त स्त्री म्हणून जगतेस! पुरुषनिर्मित कायद्याप्रमाणे वागते! कां हा स्त्रीपुरुष भेदभाव? कां स्त्री दुर्लक्षित होते? कां तिला दुय्यम वागणूक मिळते? स्त्रित्वाची पांघरलेली झूल फेकून दे. तू पुरूषासारखी जग. मानवी जीवन जग !

मीना खोंड 7799564212

Email.: meenakhond@gmail.com



ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Apr 07, 2021

कल्पना सुंदर आहे .

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
Vishv Marathi Parishad logo transperent.

विश्व मराठी परिषद

कार्यालय  : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र - ४११००४
भ्रमणध्वनी : ७०३०४११५०६  | व्हॉटसअप : ७०६६२५१२६२ |  ईमेल : sampark@vmparishad.org
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 
  • व्हॉटसअप
  • फेसबुक
  • इंस्टाग्राम
  • टेलिग्राम
  • युट्यूब चॅनेल
WhatsApp.png

© Vishwa Marathi Parishad

bottom of page