शाळा हसू दे

या रे या बालगोपालांनो
शाळेच्या या ज्ञानमंदिरी
तुम्हांविन शाळेचे प्रांगण
रडते आपुल्या अंतरी
प्रार्थनेचा स्वर ऐकवा
बालचमूंनो भरवा मेळा
अबोल वर्गखोल्यांमध्ये
घुमवा शिक्षणाचा नारा
मैदानी खेळ दिसू दे
कवितेचे सूर ऐकू दे
बागडणारे चिमुकले
चेहरे पुन्हा खुलू दे
वाजू दे शाळेची घंटा
टणटण आसमंती
शाळा पुन्हा भरूनी
सुरू होऊ दे दंगामस्ती
कोरोना तू जा रे आता
हात जोडून विनवणी
विद्यार्थ्यांविना शाळा
दिसते रे केविलवाणी
शिकवण्याचे व्रत आमुचे
अखंड सुरू राहू दे
विश्वसंकट हे विरूनी
आमुची शाळा हसू दे!
कवयित्री: सौ.चंदा वाडकर
ईमेल: chanda.wadkar1@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
99 views1 comment