घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे
गण्या,मन्या,राम्या
शेजारची पोरं
गाई-ढोरं चारती रे,
शाळेत जाऊनी
शिक्षण घे रे
माय बापासारखा तू
अनाडी नको राहू रे
पैसाचं हिशोब
शिकविनी आम्हाला
सावकार शाहीला
मिटवीनी टाक रे
घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे.......
मानुस जिवनात
रात्रण दिवस पैसा कमवूनी
रात्री राखण करी
चोरी करणारा चोर
चोरी करुनी छाताडा वर बसुनी जीव घेतो
हे सारे भोळ्या माणसाला
समजावुनी सांग रे
जनता जनार्दनाची सेवा करुनी
खऱ्या धनाची ओळख करुनी दे रे
घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे...........
गरीबाचं लेकरू तू
दोन घास खाऊनी
पथ दिव्यात
शिक रे
मोठा होऊनी तू
अन्यायाशी लढूनी रे
इतिहासाच्या पानापर
नाव कोरूनी
“दलित” शब्द काढुनी टाक रे
घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे...........
देवाच्या मोह मायेत
जाऊ नको रे
देवाच्या नावे लुटतात कंत्राटदार रे
दगडात देव नाही
समजावुनी सांग रे
घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे.............
खूब खूब शिकुनी
दुसरा बाबासाहेब बनुनी दाखव रे
आपल्या कलमावर तू
विश्वाला उचलुनी दाखव रे
घरी नको राहू मनी
शाळेला जाई रे...........
विनोद राधेलाल मोहबे मोबाईल
नं ९५४५४९६९०२
शहर -गोंदिया
Email.: vinodmohbe@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comentários