
शब्द हाच व्यवहार
शब्द देती आधार
शब्द खेळ भावनांचा
शब्दांवर प्रेम अपार !!
शब्द दावी सुख स्लप्ने
शब्दांच्या पलीकडले
शब्द जोडी भावबंध
खोल खोल मनातले !!
शब्द फुलवी अंतरंग
शब्द उठवी मनी तरंग
शब्दांशी खेळताना
दिनरात होई दंग !!
शब्दांनी होती घाव
शब्दांनी तडफडे जीव
शब्दांच्या वेदनांनी
घायाळ मनीचे भाव !!
शब्द होती सोबती
मी शब्दांशी बोलते
उरातल्या स्पंदनांना
मी भावनेशी तोलते!!
कवयित्री: पद्मा हुशिंग (ठाणे)
मो: ८७७९५४७९१७
ईमेल: padmaphushing@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
570 views0 comments