शब्द म्हणतो शब्दाला
आज सर्वत्र शब्दच पेरु दे !!
शब्दांचीच शेती ;शब्दांचीच झाडे
शब्दांचीच फळे-फुले येऊ दे !!१!!
शब्दच शब्द सगळीकडे
शब्दांचाच सडा अंगणी पसरु दे!!
जेव्हा तेव्हा पुजनी अर्चनी
शब्द सुमने वाहू दे !!२!!
शब्दांवाचून कधी कुणाचे
काही नको अडू दे !!
हवे तेव्हा ;हवे तेवढे घेऊ
शब्द कमी ना पडू दे !!३!!
कधी कठोर;कधी प्रेमळ
शब्दांचाच वर्षाव होऊ दे!!
शब्दांचीच बीजे रूजून पुन्हा
नवीन शब्द उगवू दे !!४!!
इतके सामर्थ्य या
शब्दांमध्ये असू दे !!
की केवळ उच्चारता क्षणी
क्षुधा पोटाची शमू दे !!५!!
पंखही शब्दांचेच लेऊन
हवेत मजला उडू दे !!
साता-समुद्रा पार जाऊन
शिखर शब्दांचे गाठू दे !!६!!
शब्द -शब्द करीत अंती
श्वास अखेरचा घेऊ दे !!
निःशब्द मानवा करूनी
निरोप शेवटचा देऊ दे !!७!!
कवीः-ज्ञानदेव गायकवाड (पुणे)
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
छान आहे कविता !