" अपेक्षा आजच्या सावित्रीच्या"शेणगोटे समाजाचे

पराकाष्ठा साहण्याची

शिक्षणाला योग्य साथ

ज्योतीबांना सावित्रीची

जन्म तुझा गौरवाचा

आम्हा तुझ्या लेकींसाठी

शिक्षणाचा दिला वसा

सुधारणा साऱ्यांसाठी

बांधू नका स्त्रीला आज

वृथा रूढी बंधनात

अर्थ जीवना व्यापक

स्वप्ने आणूया सत्यात

खरा हक्क स्त्रीचा तिला

देऊ समाज घरात

नको सीमा शिक्षणाला

समानता निर्णयात

जरी शिक्षण मिळते

मिळो सारे मान तिला

नको निर्भया समाजी

जगू द्यावे बालिकेला.

अर्चना मुरूगकर

तळेगाव दाभाडे, पुणे

9762863231

Email.: archanamurugkar@gmail.com


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

172 views0 comments