संकल्प सुखाचासंकल्प करुनि सुखाचा

सुखी होता येत नाही

करिता धरा कास प्रयत्नाचा

असावे तसे तुमचे इच्छाही

इच्छा असावे सुख देण्याचा

तिथे नसावे कोणी अपवाद

सुख बिनशर्त वाटण्याचा

तरच जाईल अंतर्मनाला साद

मनातून अंतर्मनात जाते संकल्प

मिळते आपले प्रयत्नाला योग्य दिशा

तेव्हाच होते जीवनात कायाकल्प

पल्लवित होते मग सुखाची आशा

दूर करुनि मनातील अडथळे

मार्ग बदलून दुःखाचे सुखाचे धरावे

सर्वांचं सुख माझे हे जेव्हा कळे

सर्वाना सुख देण्याचा विचार करावे

बदलून विचार आपुले

सर्वांचे हित शोधावे

होईल सर्वांचे भले

ऐसेच कर्म करावे

सत्यनारायण

९८२०९२१७७४

Email: satyan84@yahoo.comविश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा

303 views1 comment