संधिकालवेळा अशी ही सावळसुंदर होते दिन निशेमधील दुवा रंगांचा अद्भुत चालतो खेळ वाटे मोहक अन हवाहवा

प्रसन्न ज्योती समईतली धुपाचा दरवळ मंद मंद स्तोत्रांच्या गंभीर स्वरांनी पसरे गृहात चैतन्य आनंद

येण्याची परतून स्वसदनी पावलांना रोज आस नवी अन मनामनात उमेद जागी मिळो संधी उद्या एक नवी

छाया भासती गडद जराशा तमात सोबत त्याच करिती कातरवेळा मना भिवविता सोबतीचे हात आठविती

संधिकाल आयुष्याचाही असाच असो नितांत सुंदर आस लागे जीवनास ज्याची संधिकाली भेटावा योगेश्वर
© दीपाली सौ.वैदेही विनायक कुलकर्णी कराड.

Email.: vaidehivinayakkulkarni@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

201 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.