चैत्रात नवरंग कोवळ्या पालवीतून,गुढीतून!!
वैशाखात ओकतो भडक रणरण उन्हातून!
ज्येष्ठात वेध लावतो करडा रंग मेघातून,
आषाढात भक्तिरंग ओसंडतो वारीतून!!
श्रावणात हिरव्या रंगाची बादलीच लवंडून,
भाद्रपदांत गणेशोत्सवात गुलाल उधळून!!
अश्विनात नवरात्रीच्या नऊ रंगांतून,शारदीय चांदण्यातून,
कार्तिकात जातो दिवे, फटाके,फराळाच्या सुगंधात रंगून!
मार्गशिर्षात कडाक्याच्या थंडीत स्वरंग दत्तगुरूंना अर्पून!
पौषात तिळगुळांतून स्नेहरंग वाटून,पतंगासवे नभी उडून!
माघात जाई शिवरात्रीला उपासनेत रंगून!
फाल्गुनात होळीला रंगांची उधळण करे पाण्यातून!
बारा मास,प्रत्येक दिस तासागणिक येई नवा रंगून!
रंगांचे कालचक्र अविरत आणते जीवन बहरून!!
सण,उत्सव साजरे करण्यातून,
होते संस्कृतीचे संक्रमण व जतन!!
©️प्रज्ञा समीर बर्डे.
लिंग: स्त्री.
पत्ता: फ्लॅट नं. १२, ओंकार अपार्टमेंट, २२७ रास्ता पेठ, पुणे ४११०११, महाराष्ट्र
व्हॉट्सॲप क्र.: ९८२३२९३८७७
ईमेल: pradnyabarde22@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments