top of page

ईश्वर संकल्पनां नि आयुर्वेद पुस्तकाची भूमिकानवीन शोध किंवा संशोधनाच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास हे लक्षात येते की कधीही नवीन शोध हे एका दमात लागत नसतात ते टप्प्याटप्प्याने संशोधित होत असतात. भारतीय संस्कृती तसेच भारतीय वांग्मय देखील टप्प्याटप्प्याने वाढत आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे असे होत असताना यामध्ये सर्व संबंधित तज्ञांचा समावेश झालेला असतो. म्हणजे ते कुणा एकाचे महत्कार्य असत नाही. हेच भारतीय संस्कृती व भारतीय वांग्मय यांचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच समग्र भारतीय वांग्मय हे एकाच ग्रंथात बंदिस्त नाही. खऱ्या प्रगत ज्ञानसाधनेची सुध्दा हेच लक्षण आहे आणि ते विज्ञाननिष्ठ ही आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृती आणि समग्र वांग्मय हे प्राचीनतम परंपरा असलेले व विज्ञान आधारित ग्रंथसंपदा आहे.
भारतीय वांग्मय –

वेद – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.ऋक म्हणजे धर्म, यजु: म्हणजे मोक्ष, साम म्हणजे काम आणि अथर्व म्हणजे अर्थ असे पण म्हटले जाते. यापासूनच पुढे धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र आणि मोक्षशास्त्र यांची निर्मिती झाली.

उपनिषद - हिंदू धर्मामधील महत्त्वपूर्ण असे श्रुती धर्मग्रंथ आहेत. हे वैदिक वांग्मय चे अभिन्न अंग आहे. त्याचे लिखाण संस्कृत मध्ये झाले आहे. यांची संख्या लगबग दोनशेच्या आसपास आहे परंतु मुख्य उपनिषद हे तेरा आहेत. यामध्ये परमेश्वर (ब्रह्मा), परमात्मा आणि आत्मा यांच्या गुणवैशिष्ट चे सविस्तर वर्णन आहे.


भारतीय दर्शन - भारतामध्ये दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान या गोष्टीचा अभ्यास केला जातो. प्रमुख अशी सहा दर्शने आहेत -

आस्तिक दर्शन – सांख्य दर्शन कपिलमुनी, योग दर्शन पतंजलि, न्याय दर्शन गौतम, वैशेषिक दर्शन कणाद।

नास्तिक दर्शन – चार्वाक दर्शन, बौद्ध व जैन दर्शन।,
तसेच आयुर्वेदशास्त्र, योगशास्त्र अश्या असंख्य शास्त्राची प्राचीन काळातच निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारे पुरणाच्या अगोदरचे खूप सारे भारतीय वांग्मय उपलब्ध आहे. परंतु आजकाल याविषयी कोणीही जास्त भाष्य करत नाही. या आधारावरच आयुर्वेदशास्त्र ची निर्मिती झाली आहे. आयुर्वेदशास्त्र समग्र आणि संपूर्ण स्वास्थ किंवा आरोग्याचे शास्त्र आहे. शरीरा सोबतच मन स्वास्थ्य हे महत्त्वाचे आहे. मन स्वास्थ्य च्या दृष्टीने ब्रह्मांड किंवा सृष्टी त्यासंदर्भात आणि अध्यात्मिक विज्ञान हे माहीत असणे जरुरी आहे. यामुळेच आयुर्वेद शास्त्रातील चरक संहिता मध्ये शरीरस्थान या बृहत अध्यायामध्ये याबाबतचे सविस्तर वर्णन केले आहे. याच आधारावर ईश्वर संकल्पनां नि आयुर्वेद या पुस्तका मध्ये ईश्वर संकल्पना आणि अध्यात्मिक बाबतचे तुलनात्मक आणि वस्तुनिष्ठ चर्चा केली आहे.

ईश्वर, पुनर्जन्म, दुःख, शांती, मोक्ष, अमृत याबाबत जे काही आज संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे याबाबत भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेदशास्त्राने काय सांगितले आहे. या संदर्भातच या पुस्तकामध्ये मी चर्चा केली आहे. आशा करतो की आपणास आवडेल.डॉ सतीश गवळी, एम डी आयुर्वेद

औरंगाबाद महाराष्ट्र.

Email.: drsatishgawali@gmail.comही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

166 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page