पहिलाच पाऊस
पहिलाच वारा
आनंदाने बहरला
आसमंत सारा
या रम्य वातावरणात
सखे तुझा स्पर्श
मनाला देऊन जातो
किती तरी हर्ष
आकाशातुन बरसणाऱ्या
तेज ह्या जलधारा
आणखीनच खुलून दिसतो
चेहरा तुझा गोरा
असं वाटते हे क्षण
पुन्हा पुन्हा यावे
प्रेमाच्या सागरात
पुन्हा पुन्हा भिजावे
संदीप रामेश्वर साठे
मु. वैरागड. ता. चिखली
Email.: ssathe674@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
コメント