किती लिहाव्या कविता आणि
किती भरावी पाने वहीची
अर्थहीन शब्दांची भर्ती
कमी करावी पाने वहीची...
कपोलकल्पित लिहीता लिहीता
किती रुचावी पाने वहीची
अंधातरीचे शब्द उमटता
किती सुचावी पाने वहीची...
नकोत निव्वळ शब्द वल्गना
जगी जगावी पाने वहीची
शब्दार्थानी कळ्या फुलांच्या
फुलून यावी पाने वहीची...
युगायुगाच्या अंधाराची
जाळत जावी पाने वहीची
भीम संहिता ईथे रूजावी
निळी पुजावी पाने वहीची...
कवी :- रंगराज गोस्वामी
नागपूर
मो नं. 9970995657
Email.: rangraj.goswami75@gmail.com
ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा
Comments