top of page

पहाटेची चाहूल



पहाटेची चाहूल

पक्ष्यांची मंजुळ गाणी

ऐकू येता कानी

पहाटेची चाहूल लागते

मनाला खूप छान भासते//१//


मन प्रसन्न होते

ती किलबिल ऐकून

निरव शांतता पसरते

जाते मन एकरूप होऊन//२//


किलबिलाट तो एकाहून एक सरस

पक्षी चाखतात, खरा जगण्याचा रस

वातावरण सारे, बदलून जाते

धरा ही,  दवबिंदुत न्हाते//३//


हळू, हळू मग येती सूर्यकिरणे

टाकू लागतात, कोवळी उन्हे

प्रसन्न दिसते अवघे विश्व सारे

वाहू लागते, मंद, मंद वारे//४//


पहाटेची चाहूल असते न्यारी

वातावरण असते सगळेच भारी

अशी निसर्गाची किमया खरी

चंचल मनाला देते नवी उभारी//५//


दूर डोंगर, दिसतो भुरका

पक्षी घेती, आकाशी भिरका

आनंदून जातात, मनाच्या लहरी

दिसू लागता , पाण्याच्या घागरी//६//



कवी: गोरे जनार्दन बाळा (कन्नड, औरंगाबाद)

मो. 8956663540

ईमेल: jbgore@rediffmail.com

 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.


857 views0 comments

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page