top of page

पहा जरा पृथ्वीकडे

पर्यावरण कविता

पहा जरा पृथ्वीकडे

कोंडलाय तिचा श्वास ,

रम्य होती ही वसुंधरा

कोण ठेवणार विश्वास ?


भरून वाहणाऱ्या नद्या

ती वनराई भरगच्च

जिकडे पहावे तिकडे

ही धरती होती हिरविकंच |


धरती आमची माता

आम्ही लेकरे तिची

काय करून टाकली

आम्हीच अवस्था तिची ?


वेळ गेली नाही

अजून आहे अवकाश

रोपे लावू, झाडे वाढवू

मोकळा घेऊ श्वास |

इंधन वाचवा, वीज वाचवा

वाचवा प्राणी आणि पाणी

गाफील मानवा करू नको

आता पर्यावरणाची हानी |


👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


ऍड. गिरीश  दुबे (बुलढाणा)

मो: 9850280410

ईमेल: smallg.poet@gmail.com


 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

97 views0 comments

Recent Posts

See All

コメント


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page