top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

ओळखा



समाजाला असलेल्या प्रश्नांचा

प्रश्न तो ओळखा


केलेल्या चिंतनाचे मग उत्तर

काय ते ओळखा


मतांसाठी केलेल्या पैशांचा

भष्ट्राचार तो ओळखा


बळी पडायला आपणच

लाचार ते आता ओळखा


माणसातल्या स्वार्थीपणाचा

मुखवटा तो ओळखा


गर्दीमध्ये हरवलेला चेहरा तो

आपला ओळखा


त्या दिलेल्या जखमांची जात

आता ओळखा


पेटलेल्या त्या देहाची राख

आता ओळखा


परिवर्तनाची भरकटलेली दिशा

ती ओळखा


माणूसपणा टिकवाया संविधान

ते ओळखा



कु. अस्मिता सावंत

उल्हासनगर -421004

जिल्हा- ठाणे

मो.नं.-9730542548

Email.: asmitasawant2014@gmail.com


ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा

419 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


खूपच सुंदर काव्य वास्तवरुपी रचना आपण काव्य लेखनात मांडली आहे

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page