आहे मायेची धडपड
नाही जिवाला ऊसंत...
तणं काढती भरभर
पडत्या पाण्यात भिजत...
करते आवरा आवर
धन पाहून वावरात...
घरून दिसते धन
म्हणे कधी जाई रानात...
आहे हातात विळा
चाले मायेचा हात...
नाही कशाची तमा
वावरातल्या कामात...
बापू जाई पूढं
माय त्याची भाकर...
डोक्यावर गाठोडं
भरलं तनाणं वावर...
वावरात आहे झिजनं
माय बापूच मरणं...
माय म्हणे बापूला
वावर आपलं जगणं...
पडत्या पावसांत
खणं भरभर वाढं...
पण माय हाय तयार
तिला हाय रानाची ओढं...
कवी: दताहरी एकनाथराव कदम (भोकर, नांदेड)
मो: 9764961245
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comments