!!मी कालिंदि।!!

निधींवनिची काळी तुळस मी
फुलते स्मरून तव पावा
वृंदावनिचा रास रंगविसि
जन्म तव चरणीं वाहावा !1!
संथ काळी मी तर यमुना
पाप धुवून रंग व्हावा
गंध फुलाचा नसे ध्यास मज
घननिळा तू निकट असावा!2!
पुनश्च काळी मी ही कपिला
फुटतो मजला पान्हा
दही दूध लोणी कसा उडवितो
नंदा घरचा कांन्हा !3!
काळोखाच्या गर्भि जन्म हा
घनश्याम तू दिप असावा
संथ वाहते कृष्णा माई कर
जीवननौका पार हा धावा !4!
जीव जन्मतो आणि संपतो
काल चक्र फिरताना
अनिश्चिततेच्या काळोखातच
सूर्यकिरण श्याम व्हावा ! 5!
देह काळवंडला तरी
सरणी चंदन असावा
काय पाप अन काय पुण्य
अवघा शिवनिर्माल्य व्हावा!6!
अभंगाचा टिळा बुक्का लावून
देह मृदंगा ने ताल धरावा
काया ही पंढरी आत्मा हा
विठुराया चरणीं अर्पावा !7!
नाव. सौ शुचि बोरकर
स्थान नवी दिल्ली
मोबाईल व्हॉटसअप 9818007939
Email.: shuchiborkar@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा - https://www.t.me/vmparishad