मराठी असे ही आमुची मायबोली
जरी नसे तिला मान राजदरबारी
लाज आज वेशी टांगली इंग्रजीने
परी आस आहे अजुनी या अंतरी
खडे बोल बोलती आमुची मराठी
संस्कृती जपते ती ही माय मराठी
वळते कशी ती ही अलवार मराठी
परक्यास बोलणे कठीण ही मराठी
शब्द गुंफीत सोपी दिसे ही मराठी
फुलते परी क्रियापद अंती मराठी
असेल बापुडी गरीब माझी मराठी
लाचार ना परी स्वाभिमानी मराठी
ज्ञानदेवा वदती गर्भ श्रीमंत मराठी
तुकोबा गाती विठ्ठल अभंग मराठी
संतांची मांदियाळी ही डोले मराठी
नसे पायघडी परी ही श्रीमंत मराठी
© पल्लवी उमेश
जयसिंगपूर
pallavikularni@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
Comments