दरी खो-यातलं वैभव
तरू तरू वर मांडलं
हिरव्या हिरव्या पानातून
अक्षर अक्षर उगवलं
नीर नीर जाहले
दव दव अ..ब..क..ड
असलं वैभव जोडले
समृध्द ते जाडजुड
खानदानी लावण्य असं
मना मनात जपलं
अंगा खांद्यावर जसं
सप्तरंग ते लेवलं
माय माझी मराठीच
जशी दुधावर साय
तऱ्हा माझी मराठीच
जशी कामधेनु गाय
किती वर्णान करू मी
तिला अंतपार नाय
किती जगवारी करू मी
तिच्या परी गोडी नाय
म्हणे ज्ञानिया...मुकुंदराज... विवा
अरे...,जपुन ठेवा हा मेवा
गोड अमृत जरी
माझी मराठीच बरी...
©️®️दीपा..!!
(दीपक मा.पाठक)
Email.: dipak111267@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments