top of page

मनसोक्त जगलेल्या मनस्वी महिला



ईश्वराने सुंदर सृष्टी निर्माण केली.बुद्धीमान पुरुष निर्माण केला.शेवटी सुंदर मेधावी स्त्री निर्माण केली.


स्त्री अणि पुरूष दोघांनाही जगण्याचा समान हक्क आहे.दोघही मानव आहेत.पण शेवटी पुरूष विश्वात स्त्री ही वामा ठरली.स्त्रिची भूमिका ,स्त्रिच जगणं, तिच वागणं ,तिच वावरण सार दुय्यम समजल्या गेल.स्त्री म्हणजे सेविका आणि पुरूष मालक !...असं हे स्त्री पुरूष जीवन होत.


अगदी राजकुमारीच्या नशिबातही हेच जीवन होत.स्त्रीला आपल मतं ,आवडी निवडी ,आपले निर्णय याचे स्वातंत्र्य नव्हते.गायीसारखी स्थिती होती.पुराण काळातही स्त्रिच्या नशिबी पुरुषाची अरेरावी होती.स्त्री स्वतंत्र नव्हतीच .

राजकुमारीचे 'स्वयंवर 'असायचे.परंतू त्या स्वतःचा 'वर 'पसंत करु शकत नव्हत्या.कारण त्यात ' पण ' असायचा. तो ' पण ' जो जिंकेल त्याच्या गळ्यात निमूटपणे राजकुमारी वरमाला घालायची.


परंतू त्या काळी काही स्त्रीया आपल्या मनाप्रमाणे जगल्या. सावित्री ही त्यातील मनस्वी पौराणिक स्त्री ! सावित्रीचे स्वयंवर हे खरे स्वयंवर होते! तिने स्वतः 'वर 'परीक्षाकरून

'बौद्धिक, मानसिक,भावनिकदृष्ट्या स्वतःच्या

योग्य ,सुस्वभावी , स्वतःच्या पसंतीचा 'वर' सत्यवान निवडला. आणि त्याच्याशी विवाहबद्ध झाली..


यमराजाबरोबर ती बरोबरीने, बुद्धीचातुर्याने,

मधूर बोलली. यमराजाबरोबर तेजस्वीपणे

सुसंवाद साधला. तिने अंध सासुसासर्‍यांना दृष्टी आणि राज्य,माता -पित्याला शंभर पुत्र ,स्वतःला शंभर पुत्र मागून घेतले.अर्थात पुत्रप्राप्तीकरिता यमराजाला तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले.


विदर्भ राजकुमारी लोपामुद्राचा विवाह अगस्ती ऋषींबरोबर झाला.विवाहानंतर ते आश्रमात आले.ऋषीआपल्या साधनेत लीन झाले. लोपामुद्रा पतीव्रता पत्नीप्रमाणे आश्रमाच्या कार्यात आणि अध्ययनात रमून गेली. एक दिवस अगस्त्य ऋषींनी आपले प्रेम प्रगट केले तेंव्हा लोपामुद्रा म्हणाली ‘हे मुनिवर, प्रेम एकट्याने करायचा विषय नाही. आणि सुखही एकट्याने उपभोगता येत नाही . दोघांनाही समान सुखानुभूती यायला हवी ’


‘ म्हणजे मला काय करावे लागेल?’ अगस्ती मुनींनी विचारले .


लोपामुद्रा म्हणाली , ‘मी राजकन्या असल्यामुळे माझे वास्तव्य राजमहलात होते ! तसे वातावरण तशा सुविधामध्ये मी या अपार सुखाची अनुभूती घेऊ शकेल.'


तुला माहित होते मी एक ऋषी आहे .जेंव्हा तू विवाहाला संमती दिली तेंव्हा तू हा विचार करायला हवा होता.'


तुम्ही माझ्या पिताश्रींना राज्य नष्ट करण्याची धमकी दिली होती. माझे वडिल तुमच्या पराक्रमापुढे ते हतबल झाले. माझ्या वडिलांच्या सुखाकरिता मी विवाहाचा प्रस्ताव स्विकारला.

मी समर्पित वृत्तीने निष्ठापूर्वक तुमच्या साथीने संसार करतेय.''


परंतू तुम्हाला जे सुख हव ते त्या योग्यता तुम्ही सर्वदृष्टीने सिद्ध करायला हवी.


'यामुळे माझे तपोबल नष्ट होईल'अगस्ती मुनींनी शंका स्पष्ट केली.

त्यांनी पराक्रमाने अपार धन आणले.


प्रेमाने तपोबल नष्ट होत नसते.प्रेमभावना दोघांमध्येही जागायला हवी.लोपामुद्राने मुनीचा प्रेम प्रस्ताव स्विकारला आणि त्यांना समजावले

की प्रेम दोन मनांची भाव सृजनता आहे.

संसारात प्रेम हे फक्त सुख नसून समर्पण आहे .


हस्तीनापूरचा राजा शंतनू शिकारीला जात असतांना त्याला तहान लागली होती.तिथे जवळच नदी दिसली. राजा शंतनू नदीवर पाणी प्यायला गेला.तेवढ्यात त्याला अप्सरेसारखी अतिशय सुंदर यौवना गंगा दिसली .राजा शंतनु तिच्यावर भाळला.


सौंदर्यवती गंगेसमोर राजा शंतनूने विवाहप्रस्ताव ठेवला .गंगा विवाहाला तयार झाली.परंतू आपली अट सांगितली . 'मी काहीही करतांना मला हटकायचे नाही. असे कां करते ?विचारायचे नाही.ज्यावेळी तुम्ही मला विचाराल त्यावेळी मी सारं सोडून निघून जाईन.'


गंगाने एका राजाशी विवाह करतांना आपली अट कबूल करून घेतली.


विवाहानंतर पुत्र झाला की तो पुत्र गंगा स्वतः नदीला अर्पण करीत असे.राजा शंतनुला समक्ष पुत्र हत्या बघतांना फार वेदना व्हायच्या .पण आपला पुत्र नदीत का टाकते ?असं तो विचारू शकत नव्हता.तशी अट होती.अशी सात अपत्ये गंगाने नदीत समर्पित केली.आठव्या पुत्राच्या वेळी राजा शंतनू पुत्र वियोग, पुत्राची हत्या सहन नाही करू शकला आणि शेवटी त्याने तिला विचारले 'कां पुत्रांना नदीत टाकून मारतेस ? ' अर्थात अट मोडल्यामुळे आठवा पुत्र जीवंत ठेवून गंगा निघून गेली. तो पुत्र म्हणजे गंगापुत्र भीष्म!


पराशर मुनींना यमुना नदी पार करून द्विपावर जायच होते. तिथे नाव होती परंतू नावाडी नव्हता.एक युवती होती.ती नाव चालवायला तयार झाली. पराशर मुनी नावेत बसले.ते त्या सुंदर युवतीकडे आकर्षिल्या गेले.त्यांना त्या मोहक युवतीचा मोह झाला.त्यांनी तिला प्रणयक्रिडेची विनंती केली.


ती म्हणाली ' मी मत्स्यकन्या आहे.माझ्या अंगाचा मासोळीचा वास येतो.तो यायला नको.माझ्या भविष्याच्या दृष्टीने माझं कौमार्य नष्ट व्हायला नको.तसेच आकाशाखाली मोकळ्या वातावरणात जनमनलज्जेच्या दृष्टीने आपण म्हणता ते बरोबर नाही.'


मत्स्यगंधाने तीन अटी सांगितल्यात..मुनींनी दाट धुकं निर्माण केल्यामुळे आसमंतात अंधार पसरला.सिद्ध पराशर मुनींच्या कृपेमुळे ती सुगंधीत झाली. तिचा सुगंध कितीतरी योजने पसरायचा.ते म्हणालेत की तू योजनगंधा झालीस. या पुढे तुला सत्यवती नावाने इतिहासात ओळखतील. ते महान ज्योतिषी असल्यामुळे त्यांनी तिला सांगितले भविष्याची चिंता करू नको. तू भविष्यात राणी होऊन राज्य करशिल.'


त्यांना मुलगा झाला. कृष्णद्वैपायन ! म्हणजेच व्यास मुनी!त्याला ते आपल्याबरोबर घेऊन गेले.


एक साधी कोळीण पण आपल्या मनाप्रमाणे आपल्या अटी पूर्ण केल्या.


पुढे लावण्यावती सुगंधी सत्यवतीकडे हस्तीनापूरचा राजा शंतनू आकर्षित झाला.तो तिच्या प्रेमात पडला.त्याला सत्यवतीशिवाय काही सुचत नव्हते.राजा शंतनू जेंव्हा विवाहाची मागणी घालायला गेला तेंव्हा सत्यवतीने फार मोठी अट ठेवली.'

हस्तीनापूरच्या राजसिंहासनावर राजा शंतनू आणि गंगा यांचा ज्येष्ठ पुत्र बसणार नाही. पुढे त्यांच्या मुलांनीही राज्याचा वारसा हक्क सांगू नये म्हणून गंगापुत्राने आजन्म ब्रम्हचारी रहावे.'


सत्यवतीने हस्तीनापूरच्या सम्राटाला फार मोठी अट घातली.


गांधारीचा हस्तीनापूरचा अंध राजकुमार धृतराष्ट्राशी विवाह ठरला.तेंव्हा तिने कुणाचेही न ऐकता अगदी राजकुमार धृतराष्ट्राचाही विचार न करता डोळ्यांवर नेत्रपट्टी बांधूनच तिने विवाह केला.आणि संपूर्ण आयुष्य तशीच नेत्रपट्टी बांधून जगली.


अशा या महामहीन महिला! या स्त्रिया वास्तववादी धीट हिंमतवाल्या होत्या . स्वहित

जाणणार्‍या अस्तित्व राखणार्‍या होत्या.

स्वतःच्या अटी ठेवून यशस्वीरित्या आपल्या मनाप्रमाणे मनसोक्त जीवन जगणार्‍या या मनस्वी महिला धन्य धन्य होत.



मीना खोंड

7799564212

Email.: meenakhond@gmail.com



विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

292 views0 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page