माझ्या विठूची मला रोज याद येते
ती याद मजला आनंद देऊनी जाते ॥ धृ॥
कसे मी सांगू काही कळेना मजला
माऊली विण करमेना मजला
ती येते मन माझे आनंदूनी जाते ॥१॥
स्वप्न आहे की सत्य आहे
काही कळेना मजला
ती येते मन माझे हर्षूनी जाते ॥२॥
सांगू कुणा मी काही कळेना
कसे मी सांगू काही कळेना
ती येते मन माझे आनंदी न्हाऊनी जाते॥३॥
कशी ती येते काही कळेना मजला
का येते काही कळेना मजला
ती येते मन माझे मोहूनी जाते ॥४॥
कोठूनी येते ,काही कळेना
काही कळेना काही वळेना
ती सांज -सकाळी ,वेळी-अवेळी येऊनी जाते ॥५॥
सांगू कुणा मी कसे मी सांगू
कशी याद येते कुणाला सांगू
ती येते मज काही तरी देऊनी जाते ॥६॥
विठू s विठूss माऊली ,माझी विठू माऊली
विठूsविठूssमाऊली ,माझी विठू माऊली
कवी / गीतकार अशोक कुमावत
भ्रमणध्वनि - ९९६९५८४९६६
मुंबई -मालाड (पूर्व )
Email: ashokkumawat010@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments