top of page

माझी माय मराठीअ आई पासून सुरू होते

आणि ज्ञ ज्ञान देऊनच थांबते!


स्वतःचा स्वार्थी विचार जिला नसे

सर्वांना घरात जागा जिच्या असे!


माणुसकी साठी कधी अडाणी बने

वेळ पडली तर कधी भवानी बने!


गाण्यात सम्राज्ञी बनते

खेळात सम्राट बनते

चित्रपटसृष्टी चा पिता बनते

तर कधी पहिली राष्ट्रपिता बनते!


मराठी नाही ती फक्त भाषा

सगळ्याची ती आहे जीवन आशा!


रक्त तिचे मानवतेचे

डोळे प्रेम भरल्या नजरेचे

हात सदा पुढे सरती भले करण्यासाठी

अंतरी तिच्या माया असते सर्वांसाठी!


अभिमान नसे तिला समर्थतेचा

ना गर्व स्वतःच्या पूर्णत्वाचा

दुःख मिळाले पदरी जरी, साथ ना सोडी

ती कधी तिच्या कर्तृत्वाचा!माझे नाव : राजेश पुंडलिक थेटे (कवी राज)

राहणार : 7 प्लुमेरिया ड्राईव्ह, पुनवळे, पिंपरी चिंचवड, पुणे 33

मोबाईल: 9373322368


ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


415 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Apr 07, 2021

मस्त कविता !

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page