काय असते कविता?
शब्दाला शब्द जुळवण
की शब्दातून व्यक्त होणं
काय असते कविता?
रम्य पहाट,गारवा पावसाचा
सौम्य मृदगंध की ओलावा हवेचा
सोनकिरण प्रकाशाचा
मंद प्रकाश चांदण्यांचा
काय असते कविता ?
दुःखाची लहर,सुखाची सर
काट्याची बोच,फुलांचा बहर
शब्दांचा वार प्रखर
उपेक्षांची एक बखर
काय असते कविता?
कविता म्हणजे झरा
आनंदाने वाहणारा
मनसोक्त खळखळणारा
हवेसारखा लहरणारा
व्यक्त व्हा,मुक्त रहा
हेच सांगते कविता
मनाने मनाशी संवाद
हीच माझी कविता
©सौ.कौमुदी परांजपे
Email.: kauparanjpe@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Commentaires