
आयुष्यात कितिक लोक येतात आणि जातात...
आपल्या नकळत पावलांचे ठसे मनावर कसे उमटतात...
जरी गेले दूर तरी, सय त्यांची जात नाही...
बसले कधी एकांतात की, आठवांची दाटी होई....
उमलू लागती पाकळ्या मिटलेल्या फुलांच्या..
गंध कसा पसरू लागे मनामनांत साऱ्यांच्या...
आठवती दीस जेव्हा हसलो आणि खिदळलो...
कोसळत्या पावसात चिंब चिंब भिजलो...
थरथरता हात माझा विसावला तुझ्या हाती..
आठवता ते क्षण आज, आसवांची होते दाटी..
मैत्रीची ऊब मज फक्त तुझ्यामुळे उमगली...
मैत्रितली प्रीत निखळ तुझ्यामध्ये अनुभवली...
रण रणते ऊन जेव्हा, आठवी तुझेच बोल...
मैत्रीच्या सावलीचे कळले मलाच मोल...
आज का तुझीच सय दाटून येई सारखी...
का, कशी झाले मी तुझ्या मैत्रीस पारखी...
नसता तू माझ्यासंगे, आयुष्य हे वाटे फिके...
का असे डोळे येतात भरून, पाण्याने सारखे...
समजावते ह्या मनास.. हट्ट नको आता व्यर्थ...
दोन्ही मनात जपली....तर आहे मैत्रीस अर्थ...
नको वाट पाहू, वेड्या मनाला सावर...
जो कधीही ना सोडी साथ.... तोच खरा मैतर...
तोच खरा मैतर....
कवयित्री: सौ. प्राजक्ता केळकर (पुणे)
मो: 9049141085
ईमेल: wprajakta1985@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Commenti