माय मराठी ताज आहे
आमच्या हृदयातला
अमृताची पैज जिंके
शब्द गोड भाषेतला
काय सांगू हो श्रीमंती
माझ्या माय मराठीची
शब्द शब्द तो रसाळ
अनुभूती कैवल्याची
ज्ञानेश्वर म्हणे वाचे
अमृताची पैज जिंके
मराठीची अमोघ श्रीमंती
हरविल सोन्याच्या लंके
संत वचने कैवल्याची
वदे मराठी अभिमानाने
संस्कृतीचा जपे वारसा
सण वार सजे आनंदाने
काव्य, गीत, भारुड ,पोवाडे
गाती उज्वल इतिहासाची गाथा
लेख, साहित्य बखाण करती
शुरवीरांच्या विजयी रणकथा
संस्कृती अन् संस्कारांची
भाषा असे मराठी माय
अगणिक विभूती तीने घडविल्या
घडविले तीने छत्रपती शिवराय
धन्य धन्य हे भाग्य आमुचे
जन्मलो आम्ही महाराष्ट्रात
माय मराठी लाभली आई
शब्द अमृत चाखतो सौख्यात !!!
कवी: श्री संदीप शंकर तोडकर ( मंडणगड, रत्नागिरी )
ईमेल: sandiptodkar23@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comentarios