महाराष्ट्रास..महाराष्ट्राचा मी एक पाईक शाहीर माझे नाव;

हाती लेखणी धरुनी करी समशेरीचे घाव!


शिवशंभूच्या कर्तृत्वाने पावन झाली इथली माती;

त्या मातीचा लावू टिळा आज शंभूच्या नावे माथी!


सह्याद्रीचा काळा पत्थर उभा राहिला पाठीशी'  

देतो स्फूर्ती शूरवीरांना रक्षा या महाराष्ट्राशी!


एकचि बाणा असे आमुचा सांगे राम आम्हास;

शिकवण ठेवोनि ध्यानी त्यांची करितो सायास!


सिंह ज्यांचा तो गर्जला सबंध भारत वर्षात;

केली होती ज्यांनी मदांध इंग्रजांवरती मात!


असा माझा महाराष्ट्र ! आहे काय कमी ह्यात?

पुण्यत्वाची वसली नगरे माझ्या मायभूमीत !

कवी: पुंडलिक गवंडी (अहमदनगर)  मो: - ९२७२१३५९११

ईमेल: pcgawandi@gmail.com


नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad