top of page

कृष्ण भक्ती

(कवी: निर्मलचंद्र पवार)

मी कृष्णभक्तित अनुभवलेलं हे एक द्रृश्य आहे, कदाचित तुम्हालाही ही अनुभूती येईल...


काय वर्णु त्या केशवा

उठला गुपचुप मध्यरात्रिला..

कौस्तूभ मस्तकी ,

मयूर पीस शोभे साथीला !

गळा वैजयंति कानी कुंडले ,

पिताम्बर नेसीला !

खोचिलि पावरी कनवटि ..

अन सज्ज जाहला !


बासरीने खुणेची साद घाली,

सर्व सख्या गोपालां !

जमले सगळे मित्र मंडळ ,

शांत यमुना काठा..

ल्यायले सर्व अनुपम वसने ,

अन शिरी मोर पिसा ..

दिसे विलोभनीय सारे,

जणू दिव्य साथीदारकृष्णा..!

मग रात्रीच खेऴ चाले ,

उधाणे आनंदभावना !

यमुनाहि मग ऊल्हासे..

येइ खळाऴत साथीला ..!


विकसित चंद्रहीं उत्सुक,

पाही तेजप्रभे अवधाना!

खग लता वृक्षहीं आनंदे,

डोलति,न्याहाळती जलसा!

अन अवचित मेघहीं करती दाटी ,

धावती श्रीहरी दर्शना !

वर्षाहींमागोमाग भूरभूरे ,

जणू नयनी अश्रू आसमंता !


जाणुनी तो शिड्कावा..

आर्द्र प्रेमस्पर्श शरीरा ,

योगेश्वरे स्मितहास्ये..

नयनेच स्वीकारून त्या प्रेमा,

देइ सांत्वना , अन खुणे आज्ञापीत इंद्रा..

रोखण्या त्या जल-धारा !

रास रंगला मग असा अविरत ,

काळहीं तेथे थांबला.. !


हरीची गुप्त चतुराई,

ना कळली काही कोणा !

बेभान टिपरि चालली,

नामाधव चुकला ताला !

त्या चांदण्यात चंदेरी ,

साथीला शीतल वारा !

अहा स्वर्गींच्या गंधर्वा, देवा वाटे हेवा,

उतरले पाहण्या दंगा !


खेळता हरीसंगे जाहलेकृष्णमय,

हरले सर्व भाना..

ज्ञान समस्त वेदांचे ,

निमालीमीतु पणाची भावना ..

प्रत्येक सखा मैत्रिणीस ..

आली अनुभूति जेव्हा..

की रमलो संगेकृष्णा,

मग थांबला रास तेव्हा


तृप्त सवंगडी दमले,

श्रम परिहारे विनवीतीकृष्णा!

वाजवी वाजवी ना रे मोहना ,

दिव्य तुझा तो पावा!

हासुनी भगवंते पाहीले ,

डोलला पाहूनीभक्तिरसा!

श्रीकृष्णे तेही केले ,

ऐकवूनि बासरी, तोषविले सखयां !


ते गोधन होते स्तब्ध ,

सुख निद्रा समस्त गोकुळा..

सारे मस्तीत परतले घरा,

ना उरल्या पाऊल खुणा!

ही कैसी प्रभुची लीला..

जाणे एकची तो श्रीधरा !


कविता कशी वाटली? कमेंट करा. कविता व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करा.


श्री निर्मलचंद्र पवार (ठाणे)


 
292 views2 comments

Recent Posts

See All

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह...

2 Comments


Madhura Nagavkar
Jul 04, 2020

Krishna.. चित्र रंजन

Like

Sushama Vadalkar
Jul 04, 2020

Very nice

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page