खरी वारी

(कवि: अरुण जोशी)


पांडुरंग हरी  ! उभा विटेवरी

कर  कटावरी ! ठेवोनिया 


कणखर यष्टि ! अविरत दृष्टी

म्हणे ऐका वाणी ! मनोमनी 


नित्य कर्म करा ! प्रसंगाशी लढा

चित्ती समाधान !  मानुनीया 


संसार सागर ! करायाचा पार

मुखावरी हास्य ! राखोनिया


आई बाप सेवा ! करा मनोभावे

भक्त पुंडलिक ! होऊनिया 


हवा, पाणी, माती ! विठूची वसती

स्वच्छ ठेवा सारे ! वंदुनिया


मनी ठेवा भाव ! मुखी ठेवा नाम

हीच खरी वारी ! पंढरीची


अरुण दिगंबर जोशी (सोलापूर)

मो: 8275302930 

ईमेल: imsarunjoshi@gmail.com

134 views0 comments

Recent Posts

See All

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित