कचरा उघड्यावर टाकणे, ही आहे चूक,
आणि तो कचरा उघड्यावर जाळणे, ही आहे एक घोडचूक.
आगीतून फुफाट्यात म्हणावं,
तसंच प्रकरण, कचरा जाळल्याने होत असावं.
कचरा कुठेही असो, कसाही असो, योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट झालीच पाहिजे. उगीचच, त्याच्यापासून सुटका हवी म्हणून, तो बेजबाबदारपणे, जाळला नाही पाहिजे. कचरा जाळण्याचे तोटे, अहो किती म्हणून मोजू, होणाऱ्या नुकसानाला, नाही कुठला तराजू. वातावरणात काही धूर नाही होत फक्त, तर कित्येक विषारी वायू, होत असतात मुक्त. खोकला दमा छातीचे, लोकांना होतात विकार, आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे, अनेक आहेत प्रकार. प्राणी आणि पक्ष्यांनी तरी कुठे जायचे, त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांना कुणी कसे मोजायचे? शुद्ध हवेची वाट तर लागतेच लागते, पण, कचऱ्याचे अग्नी तांडव आवरता, नाकी नऊ येते. जमिनी होतात नापीक, पाण्याचे साठे होतात दूषित, इतकं सर्व होत असताना, आपण कचरा जाळता, तो कुठल्या खुशीत? म्हणूनच कचरा जाळणे टाळावे आपण, याचे भयानक दुष्परिणाम जाणावे आपण. कचरा जाळून, वातावरण बदल आणि प्रदूषण इत्यादींना, जनता खुले आमंत्रण द्यायचे, थांबवावे आपण.
नाव: भारती बस्ताडे कूट (महिला) फोन नंबर: ८३०८८२७७५१ ईमेल: bharatikoot.bbk@gmail.com
शहर: पुणे
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
खूप छान अवलोकन आणि शिकवण